भगवानपूर गावात गाव संघटनेच्या प्रयत्नाने अवैध दारूविक्री बंद होती. मात्र मागील पाच ते सहा महिन्यांपासून गावातील ७ दारू विक्रेत्यांनी अवैध व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे उसेगाव, आंबेशिवणी, सावरगाव व सभोवतालच्या गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी गावात दाखल होतात. परिणामी गावात व परिसरात महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करीत जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान, दारू गाळण्यासाठी टाकलेला १० हजार ५०० रुपये किमतीचा दीड क्विंटल मोहसडवा आढळून आला. मोहसडवा, दारू गाळण्याचे साहित्य व ड्रम घटनास्थळावर नष्ट करण्यात आले. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक कुमरे, परशुराम हलामी, मुक्तिपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
===Photopath===
300521\30gad_1_30052021_30.jpg
===Caption===
साहित्य नष्ट करताना पोलीस व मुक्तिपथचे कार्यकर्ते.