शेतकरी दिवाकर चलाख हे त्यांचा मुलगा सूरज याला घेऊन रात्री ११ वाजतादरम्यान चिचडोह बॅरेजकडे असलेल्या शेतातील धानपिकाला पाणी देण्यासाठी जात असताना एक मोटारसायकल समोरून येताना दिसली. त्यावरील दोन युवकांजवळ काहीतरी भरलेली एक चुंगडी दिसली. त्यांना थांबवून नाव, गाव विचारले असता मोटारसायकलवर मागे बसून असलेला इसम पळून गेला. त्यामुळे चालकाला पकडून चुंगडीची पाहणी केली असता त्यामध्ये मोटारपंपाकरिता लावलेले अंदाजे १५० फूट सर्व्हिस वायर (किंमत ६००० रुपये) मिळून आले.
हे सर्व्हिस वायर दिवाकर चलाख यांच्या शेतातील मोटारपंपाचे असल्याचे निष्पन्न झाले. नरेंद्र सोमनकर, सुधाकर चलाख यांच्या मदतीने या वायर चोरी करणाऱ्यासह त्याची दुचाकी आणि वायर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास पोहवा दिलीप खोब्रागडे करीत आहेत.
140821\img-20210814-wa0106.jpg
फोटो