यावेळी गोविंदराव ब्राम्हणवाडे, विलास निंबोरकर, प्रा. देवानंद कामडी, पुरुषोत्तम ठाकरे, यादव बानबले उपस्थित होते. ही मदत पुरविण्यासाठी राजेश इटनकर, प्रशांत पुंडलिकर, तुलाराम नैताम, आशाताई करोडकर, लताताई शिरणकर, मारोतराव बाळेकरमकर, प्रकाश सोनवणे, शरद चापडे, राजेंद्र उरकुडे, इशांत राडे, संतोषराव खोब्रागडे यांच्यासह ग्रुपमधील २५ सभासदांनी आपला वाटा दिला आहे.
रामाजी चुधरी व त्यांची पत्नी हे मुलांपासून वेगळे राहत होते. मोठा मुलगा अनेक दिवसांपासून पहिल्या पत्नीपासून वेगळा राहात असल्याने त्यांच्या दोन मुलाचा सांभाळ आजी-आजोबा हेच करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सारुबाई ही नातवंडांना घेऊन राहत आहे. म्हातारा गेल्यामुळे त्यांचा संसाररूपी गाडा पुढे कसा हाकायचा? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यांना शासकीय योजनांसाठी काही अडचणी आल्यास मदतीचा एक हात हा ग्रुप पाठीशी आहे, असा दिलासा दिला.