जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ९००१ जणांपैकी ८७१४ कोरोनामुक्त झाले असून १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १८६ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ टक्के, क्रियाशिल रुग्णांचे प्रमाण २.०७ टक्के तर मृत्यूदर १.१२ टक्के झाला आहे.
नवीन ४५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७, अहेरी २७, आरमोरी २, चामोर्शी ५, धानोरा २ आणि सिरोंचा २ आदी रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या १० रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९ आणि चामोर्शी तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर १, आरमोरी रोड १, वनश्री कॉलनी १, बैरंग १, मारोडा १, कलेक्टर कॉलनी १, गोकुलनगर १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ ९, दुसऱ्या सीआरपीएफ बटालियनमधील २, एसआरपीएफ ८, स्थानिक १, रेपनपल्ली ३, आलापल्ली ३, बोरी १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वडेगांव १, स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील रामपूर १, लखमपूर बोरी १, स्थानिक २, आष्टी १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ २, सिरोंचा तालुक्यातील स्थानिक २ जणांचा समावेश आहे.