लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ रविवारी २४ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सदर योजनेबाबत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आ.डॉ. देवराव होळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, विशालकुमार मेश्राम, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे, जमीन शाखेचे तहसिलदार ठाकरे उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात विस्तृत माहिती दिली. आतापर्यंत ६५ हजार शेतकºयांची नोंदणी झालेली आहे. आपल्या जिल्ह्यात एक लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतील, असे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. तेव्हा तलाठी कार्यालयात, ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपली यादी व दिलेली माहिती बरोबर आहे की, नाही याची खातरजमा करावी. रविवारी प्रथम टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. चार महिन्यानंतर दोन हजार आणि पुढील तिसरा हप्ता चार महिन्यानंतर जमा होईल, असे जिल्हाधिकारी सिंह म्हणाले. शेतकरी बांधवानी आपला तसेच आपल्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना सुध्दा तातडीने या सन्मान योजनेकरीता माहिती सादर करण्यासाठी सतर्कता बाळगावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे या योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात शुभारंभ झाला. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग, शिवप्रकाश शुक्ला, सुर्यप्रताप साही, महेंद्रनाथ पांडे यांची प्रमुख उपथिती होती. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दाखविण्यात आले. एनआयसीचे शिवशंकर टेंभुर्णे आणि त्यांची चमु यासाठी कार्यरत होती.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेच्या लाभार्थ्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
एक लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:20 AM
शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा गडचिरोलीत शुभारंभ