लोकमत न्यूज नेटवर्कबामणी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचाचे उपविभागीय अधिकारी शंकर गाजर्लावार व बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी के.पी. गैरकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाºयांसह बामणी वनपरिक्षेत्रातील सिरकोंडा जंगल परिसरात गुरूवारी सापळा रचून वनतस्कराकडून २.१८२ घनमीटरच्या १ लाख ९ हजार रूपये किंमतीचे सागवान लठ्ठे जप्त केले.सिरकोंडा जंगलात काही वनतस्कर तीन ट्रॅक्टरमध्ये भरून सागवान लठ्ठे नेत असल्याची माहिती वनाधिकाºयांना मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून हे सागवान लठ्ठे जप्त करण्यात आले. मात्र वनाधिकाºयांची चाहूल लागताच सर्व वनतस्कर घटनास्थळावरून पसार झाले. सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी गाजर्लावार, वनपरिक्षेत्राधिकारी गैरकर, सिरकोंडाचे क्षेत्र सहायक आर.सी. आडेपू, परसेवाडचे क्षेत्र सहायक विजय तेलंग, पी.के. परसा, प्रभाकर वनकर, सिरोंचा येथील फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल जम्बोजवार, सिरकोंडा उपक्षेत्रातील वनकर्मचारी आर.एम. राऊत, पी.आर. पाटील, सी.पी. सोनकांबळे, ए.आय. मट्टामी यांच्यासह वनमजुरांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सिरकोंडाचे क्षेत्रसहायक आर.सी. आडेपू करीत आहेत.
एक लाखांचे सागवान लठ्ठे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:01 AM
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचाचे उपविभागीय अधिकारी शंकर गाजर्लावार व बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी के.पी. गैरकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाºयांसह....
ठळक मुद्देसिरकोंडा जंगलात कारवाई : वनाधिकारी व कर्मचाºयांना यश