आलापल्ली येथील वीर बाबुराव चौकात बंदुकवार यांचे सलूनचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे अनिल व राहुल बंदुकवार हे आपल्या दुकानात गिऱ्हाईकांची दाढी व कटिंग करीत होते. त्यावेळी भिंतीच्या बाजूला युवक सुनील राऊत व अन्य दाेघेजण बसले होते. सलूनच्या अगदी बाजूला शिवसेना उपजिल्हाप्रमुख धर्मा रॉय व प्रमोद मेश्राम यांच्या मालकीच्या जागेवर बांधकामासाठी सहा फूट खोल खड्डा मंगळवारी जेसीबी मशीनद्वारे खोदण्यात आला होता. हा खड्डा खोदताना सुरक्षित अंतर न राखल्यामुळे भिंतिवर दबाव पडून ती कोसळली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन भिंतीखाली दबलेल्या जखमी युवकाला बाहेर काढण्यात आले. जखमी युवकाच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून चंद्रपूरला रेफर करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, जगन्नाथ मडावी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
सलूनची भिंत काेसळल्याने एकजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:57 AM