शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

चामोर्शी बाजार समितीवर गण्यारपवार गटाचा एकतर्फी विजय

By admin | Published: September 16, 2015 1:45 AM

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार ...

सर्व जागा जिंकल्या : भाजपसह राष्ट्रवादींच्या हलगेकरांना जोरदार हादराचामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवून भाजप समर्थीत पॅनलचा धुव्वा उडविला. भाजप पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.सेवा सहकारी मतदार संघातून अतुल गण्यारपवार गटाचे सात सदस्य विजय झालेत. यामध्ये अरूण बंडावार २८१ मते, अतुल गण्यारपवार ३००, जानकीराम कुसनाके २६३, परमानंद मलिक २७५, सुधाकर निखाडे २८८, गोसाई सातपुते २८१, शंकरराव वंगावार २५६ मते घेऊन विजयी झाले. यांनी भाजपा समर्थीत गटाचे बाबुराव बकाले २१३, धर्मेंद्र दुबे २१७, किरण कोवासे २०५, तुकाराम तोरे २०२, शिशीर पोतदार १९५, कैलाश सातपुते २०९, फकीरा ठेंगणे यांना १८८ मते मिळून त्यांचा पराभव झाला. याच गटात अपक्ष असलेले यशवंत देवतळे यांना ७, देवराव सिडाम यांना चार मते मिळाली. महिला गटातून अतुल गण्यारपवार गटाच्या बैनाबाई मडावी, कौशल्या पोरटे यांनी भाजप समर्थीत गटाच्या बेबी भोयर, भानूमती राय यांचा पराभव केला. बैनाबाई मडावी यांना २७८, कौशल्या पोरटे यांना २८३, बेबी भोयर यांना २४४, भानूमती राय यांना २११ मते मिळाली. इतर मागास वर्गीय गटातून अतुल गण्यारपवार गटाचे विनायक आभारे २७६ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी भाजप समर्थीत गटाचे सुधीर शिवणकर यांचा पराभव केला. शिवणकर यांना २५० मते मिळाली. भटक्या जमाती विमुक्त जाती गटात अतुल गण्यारपवार गटाचे गणपती भेंडारे २७८ मते घेऊन विजयी झालेत. त्यांनी भाजप समर्थीत गटाचे यशवंत कलसार यांचा पराभव केला. कलसार यांना २४४ तर अनिल एलावार यांना सहा मते मिळाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातून गण्यारपवार गटाचे सतिश रॉय ३८५ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजप गटाचे उमेश कुकडे यांचा पराभव केला. कुकडे यांना २८४ मते मिळाली. तर या गटात अपक्ष किशोर पोरटे यांना आठ मते मिळाली. हमाल, मापारी, तोलारी गटातून अपक्ष अनिल नैताम १०७ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी विलास कुकडे यांचा पराभव केला. कुकडे यांना ९६ मते मिळाली. या गटात संदीप राऊत यांना तीन मतांवर समाधान मानावे लागले. यापूर्वीच अमोल गण्यारपवार, शामराव लटारे, चंद्रकांत दोषी, बाजीराव गावडे हे अविरोध निवडून आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रविण निनावे यांनी काम पाहिले. सहा टेबलावर मतमोजणी प्रक्रिया चालली. यावेळी पोलीस निरिक्षक किरण अवचार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलला काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार दीपक आत्राम यांनी सहकार्य केले होते. या पॅनलच्या विरोधात भाजपने निवडणूक रिंगणात उडी घेतली. भाजपच्या पॅनलची धूरा खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतूराज हलगेकर यांनी सांभाळली होती. या पॅनलला गण्यारपवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने चारही मुंड्या चित केले. एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. दारूण पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही प्रचंड अस्वस्थता आहे. (तालुका प्रतिनिधी)