सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पालकवर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतातच राबत असतो. त्यामुळे बॅंकेत जाऊन खाते कधी काढावे, असा प्रश्न पालकांसमाेर निर्माण झाला आहे. गडचिराेली जिल्ह्यात बॅंकांची संख्या कमी आहे. एटापल्ली, धानाेरा, भामरागड, सिराेंचा या तालुक्यांमधील नागरिकांना बॅंकेसाठी ४० ते ५० किमीचे अंतर पार करावे लागते. अशा स्थितीत हे पालक खरेच बँक खाते काढण्यासाठी बँकेत जाणार काय, असा प्रश्न आहे.
बाॅक्स
खाते आहेत मात्र संख्या कमी
शिष्यवृती व इतर याेजनांसाठी विद्यार्थ्यांचे बॅंकखाते उघडण्यात आले आहेत. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी आहे. ज्यांच्याकडे खाते नाही. त्यांना आता खाते काढावे लागणार आहे. १५६ रुपयांसाठी पालक एक हजार रुपये खर्च करणार नाहीत. खाते न निघाल्यास पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा हाेणार नाहीत.
काेट
केवळ १५६ रुपयेे मिळविण्यासाठी काेणताच पालक एक हजार रुपये खर्च करून बँक खाते काढणार नाही. शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्रित रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करणे आवश्यक हाेते. ही रक्कम मुख्याध्यापक संबंधीत विद्यार्थ्यांचे पालक, भाऊ यांच्या खात्यावर टाकू शकले असते. बँक खाते नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पैशांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करावी.
पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना
बाॅक्स
९ जुलैपर्यंत डेडलाईन
ज्या विद्यार्थ्यांचे बॅंक खाते नाहीत त्यांनी ९ जुलैपर्यंत बँक खाते काढायचे आहे. मुख्याध्यापकांनी याची माहिती पंचायत समितीमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करायची आहे. शेतीचा हंगाम आता सुरू आहे. अशा स्थितीत ९ जुलैपर्यंत बँक खाते उघडणार काय, असा प्रश्न आहे.
बाॅक्स
वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
पहिली-१५,४०८
दुसरी-१७,२६३
तिसरी-१६,६५६
चौथी-१६,८३८
पाचवी-१६,१९६
सहावी- १६,२५६
सातवी-१६,९२४
आठवी-१६,११७