लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली कार्यालयामार्फत स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर स्मार्ट फोनमधून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमींवर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल यांनी ही वेबसाईट तयार केली आहे.या वेबसाईटवर गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या चार तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकची माहिती कृषी सहायक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. सदर लिंक संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून दिली आहे. कृषी विभागाच्या या नवीन उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्याचे पूर्ण नाव, गाव, तालुका, मोबाईल क्रमांक, लिंग, प्रवर्ग, शेतीचे क्षेत्र तसेच कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या योजनेवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सदर अर्ज सबमिट करायचा आहे.या योजनांचा घेता येईल लाभसदर ऑनलाईन अर्ज २० एप्रिलपर्यंत करायचे आहेत. त्यात बाबासाहेब फुंडकर फळबाग योजना, मनरेगा फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, तुषार सिंचन योजना, ठिबक सिंचन योजना, कीटकनाशकांसाठी अनुदान, औषधी वनस्पती लागवड, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यासदौरा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे.
कृषी योजनांसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्जाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 5:00 AM
शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल यांनी ही वेबसाईट तयार केली आहे.
ठळक मुद्देनाविन्यपूर्ण उपक्रम : लॉकडाऊनमुळे अडणार नाही शेतकऱ्यांचे काम; लिंकवर भरता येणार माहिती