आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात बांधकाम करणाऱ्या नागरिकांना यापुढे नगर परिषदेत परवानगीसाठी उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नसून आॅनलाईन पध्दतीने बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे.आॅनलाईन परवानगीचा शुभारंभ नगराध्यक्ष शालू दंडवते यांच्या हस्ते करण्यात आला. देसाईगंज शहरातील हनुमान वार्डातील तोषकुमार गोविंदा धोटे यांनी संगणकीकृत प्रणालीद्वारे आॅनलाईन पध्दतीने बांधकामाची परवानगी मागितली होती. नगर परिषदेचे नोंदणीकृत अभियंता के. एस. कातुरे यांना नगराध्यक्षांच्या हस्ते बांधकाम परवानगीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मुख्याधिकारी तैमुर मुलानी, मनोज खोब्रागडे, अशोक कांबळे, नगर परिषदेचे बांधकाम अभियंता अनिल दाते, प्रफुल्ल दुपारे उपस्थित होते. या नवीन प्रणालीमुळे कमी त्रासात व विहित मुदतीत बांधकामाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. याच पध्दतीने ज्योत प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकाºयांनी दिली.
देसाईगंज येथे आॅनलाईन बांधकाम परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:43 PM
देसाईगंज नगर परिषद क्षेत्रात बांधकाम करणाऱ्या नागरिकांना यापुढे नगर परिषदेत परवानगीसाठी उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नसून आॅनलाईन पध्दतीने बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे.
ठळक मुद्देशुभारंभ : नागरिकांचा त्रास वाचणार