शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ऑनलाईन शिक्षणाने वाढले विद्यार्थ्यांमध्ये डाेळ्यांचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:29 AM

गडचिराेली : काेराेनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय समाेर आला. पहिल्या वर्गापासून तर दहावी, बारावी वर्गापर्यंत विद्यार्थी स्मार्टफाेन, आयपॅड, ...

गडचिराेली : काेराेनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय समाेर आला. पहिल्या वर्गापासून तर दहावी, बारावी वर्गापर्यंत विद्यार्थी स्मार्टफाेन, आयपॅड, संगणकाचा वापर करीत आहेत. मात्र डाेळ्याची निगा राखण्याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने डाेळ्यांच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. अशा स्थितीत ऑनलाईन अभ्यास करताना डाेळ्यांची विशेष काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.

काेराेना संसर्गाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात हाेती. त्यामुळे शासनाच्यावतीने ऑनलाईन पर्याय समाेर आणण्यात आला. मात्र ऑनलाईन अभ्यासक्रम व शिक्षणात माेबाईलचा अतिवापर हाेत असल्याने त्याची भीतीही सर्वत्र व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील काही पालकांनी कसेबसे करून स्मार्टफाेनची खरेदी करून ताे पाल्यांच्या हातात दिला. आपला मुलगा अगदी कमी वयामध्ये स्मार्टफाेन सहज हाताळताे हे पाहून पालकांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसून येत आहे. मात्र हा आनंद भविष्यासाठी धाेकादायक ठरू शकताे. अगदी लहान मुले नंबरचे चष्मे लावून फिरत असल्याचे गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात दिसून येत आहे.

शाळेन ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही मुले अधिक वेळ माेबाईलमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे झाेप कमी हाेत असून मुलांच्या स्वभावात चिडचिडेपणा येत आहे. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच माेबाईल व लॅपटाॅपचा वापर करणे गरजेचे आहे. केजी १ पासून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थी हातात माेबाईल घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑनलाईन शिक्षणासाठी माेबाईलचा अतिवापर झाल्यास दुष्परिणाम दिसून येतील.

बाॅक्स

अशी घ्या दक्षता

सतत माेबाईल स्क्रीन बघितल्यामुळे मुलांमध्ये डाेळ्याचे दाेष निर्माण हाेण्याची शक्यता आहे. शिवाय स्क्रीनवर काम करताना डाेळ्यांना थकवा येताे. त्यामुळे मध्ये मध्ये डाेळे बंद करून विश्रांती घेतली पाहिजे. डाेळ्यांची स्वच्छता चांगली राखावी. थंड पाण्याने डाेळे धुणे आवश्यक आहे.

काेट

डाेळ्यांना विश्रांती हवी

प्रत्येकांच्या डाेळ्यांना नैसर्गिक संरक्षण आहे. त्यामुळे, माेबाईल, लॅपटाॅप व काॅम्प्युटर आदींमध्ये आवश्यकतेनुसार ब्राईटनेस ठेवावा. डाेळ्यांना थाेड्याथाेड्या अंतराने चालूबंद करावे. १५ ते २० मिनिटे सतत स्क्रीनवर काम केल्यानंतर संबंधितांनी दूरवर बघण्याचा प्रयत्न करावा. काही क्षणासाठी डाेळे मिटून डाेळ्यांना विश्रांती द्यावी. त्रास वाढल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डाॅ. एल. टी. वट्टी,

नेत्र राेगतज्ज्ञ, गडचिराेली

माेबाईलचा अतिवापर नकाे

तीन वर्ष आतील लहान बालकांना माेबाईल देणे बालकांनी टाळावे. आता ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक पालक बालकांच्या हाती स्मार्टफाेन देत आहेत. बालकांकडून स्मार्टफाेनचा अतिवापर हाेऊ नये. स्मार्टफाेनच्या वापराने दृष्टिदाेष निर्माण हाेतात. रेटिना कमजाेर हाेताे. माेबाईलच्या अती वापराने बालकांमध्ये चिडचिडेपणा व रागीटपणा वाढताे.

-डाॅ. प्रशांत चलाख,

बालराेगतज्ज्ञ, गडचिराेली

अभ्यासाव्यतिरिक्त माेबाईलचा वापर

काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुलांना स्मार्टफाेन देणे आवश्यक झाले आहे. मात्र बरेच शाळकरी मुले, मुली शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्तही स्मार्टफाेनचा इतर कामासाठी वापर करीत आहेत. व्हिडीओ गेम, कार्टून पाहत असल्याचे मुले दिसतात.

- रेवनाथ नरुले,

पालक