शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

केवळ २५ टक्के भाग मोबाईलच्या कव्हरेजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:20 AM

संपर्काचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल आता अत्यावश्यक झाले आहेत. पूर्वीची चैनीची वाटणारी ही वस्तू आता मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्याही अवाक्यात आली आहे. मात्र पुरेशा टॉवरअभावी जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग अजूनही मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आहे.

ठळक मुद्दे१२३ टॉवर प्रस्तावित : जिल्ह्यासाठी आणखी २१२ टॉवरची गरज

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपर्काचे सुलभ माध्यम म्हणून मोबाईल आता अत्यावश्यक झाले आहेत. पूर्वीची चैनीची वाटणारी ही वस्तू आता मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्याही अवाक्यात आली आहे. मात्र पुरेशा टॉवरअभावी जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग अजूनही मोबाईल कव्हरेजच्या बाहेर आहे. संपूर्ण जिल्हा मोबाईल कव्हरेजमध्ये आणण्यासाठी तब्बल ५०० पेक्षा जास्त टॉवरची गरज असताना आता जेमतेम १०७ टॉवर कार्यरत असून ८९ टॉवरच्या उभारणीचे काम सुरू आहे.जंगलाचा प्रदेश आणि नक्षलवादी कारवायांमुळे मोबाईल सेवा देणाºया खासगी कंपन्या या जिल्ह्यात आपले हातपाय पसरायला इच्छुक नसतात. त्यामुळे शहरी भाग आणि नक्षली कारवायांपासून मुक्त असणाºया भागातच त्यांचे टॉवर लागले आहेत. पण सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (भारत संचार निगम लि.) ने जिल्ह्यात मोबाईल कव्हरेजचे जाळे विणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने मोबाईल टॉवरची उभारणी सुरू आहे.आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०७ टॉवरवर बीएसएनएल तब्बल ३ लाख ६४ हजार मोबाईल ग्राहकांचा ताण सहन करीत आहे. दर महिन्याला ६ हजारांपेक्षा जास्त नवीन ग्राहकांची भर त्यात पडत आहे. आतापर्यंत सर्व १०७ टॉवरवरून २ जी इंटरनेट सेवा मिळत होती.आता त्या टॉवरवरून ३ जी सेवा देण्यास सुरूवात झाली आहे. सरकारने परवानगी दिल्यास ४-जी सेवाही सहज मिळू शकते, मात्र केंद्र सरकारने त्यासाठी परवानगी दिलेली नाही.८९ नवीन टॉवरची उभारणीएप्रिल २०१७ पासून जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने मंजूर झालेल्या ८९ नवीन टॉवरच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यापैकी १७ टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. त्यात गडचिरोली तालुक्यात ६, चामोर्शी तालुक्यात ३, कुरखेडा तालुक्यात ३, देसाईगंज तालुक्यात २, आरमोरी २ तर मुलचेरा तालुक्यात १ टॉवर उभारण्यात आला आहे.यासोबतच केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) १०३ टॉवरच्या मागणीचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. तो मान्य झाला आहे. मात्र निधीअभावी त्या टॉवरच्या उभारणीचे काम थांबले आहे. याशिवाय बीएसएनएलने आणखी २० टॉवरच्या मंजुरीचा प्रस्ताव नुकताच पाठविला आहे. या सर्व टॉॅवरनंतर किमान अर्धा जिल्हा मोबाईलच्या कव्हरेजमध्ये येईल.

टॅग्स :Mobileमोबाइल