लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवीन वर्षाला सुरूवात होताच प्रत्येक कार्यालयाला कर वसुलीचे वेध लागतात. गडचिरोली नगर परिषदेनेही जास्तीत जास्त कर वसुली व्हावी, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र १० जानेवारीपर्यंत केवळ ३५ टक्केच कर वसुली झाली आहे.नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविल्या जातात. त्या मोबदल्यात नगर परिषद मालमत्ता कर, वृक्ष कर, शिक्षण कर, रोहयो कर व पाणीपट्टी वसूल करते. गडचिरोली शहरात एकूण १२ हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडून थकीत व चालू असे एकूण २ कोटी ६८ लाख १७ हजार रुपयांचा मालमत्ता कराची वसुली करायची आहे. त्यापैकी १० जानेवारीपर्यंत ९५ लाख ५४ हजार ५१५ रुपये एवढीच वसुली झाली आहे. एकूण मागणीच्या कर वसुलीचे प्रमाण ३४.५० टक्के एवढे आहे. थकीत व चालू असा एकूण ३ लाख ६४ हजार १७१ रुपयांचा वृक्ष कर वसूल करायाचा आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ५२२ रुपये एवढी वसुली झाली आहे. हे प्रमाण २९.७९ टक्के एवढी आहे. शिक्षण कराची एकूण मागणी ४३ लाख ३९ हजार ५२ रुपये एवढी आहे. त्यापैकी १२ लाख ८५ हजार ५२२ रुपये वसूल झाले आहेत. रोहयो कराची मागणी ३ लाख ९८ हजार ३११ रुपये एवढी आहे. त्यापैकी ८४ हजार ९१२ रुपये वसूल झाले आहेत. हे प्रमाण २१.३१ टक्के एवढे आहे.पाणीपट्टी कराची स्वतंत्र वसुली केली जाते. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये आहे. त्यापैकी ४५ लाख ७ हजार ४८१ रुपये वसुली झाली आहे. नगर परिषदेला करांच्य माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग नगर परिषद स्वत:च्या आवश्यकतेप्रमाणे खर्च करू शकते. त्यामुळे या करांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी कर वसुली ९० टक्क्यांच्यावर पोहोचविण्याचा प्रयत्न नगर परिषदेमार्फत सुरू आहे.प्रत्येक महिन्याला २ टक्के व्याजदरनगर परिषद अधिनियमानुसार थकीत करावर दर महिन्याला २ टक्के कर आकारला जातो. एखाद्या मालमत्ताधारकाचे कर एक वर्ष थकीत असेल तर त्याच्या एकूण मालमत्ता करावर २४ टक्के व्याजदर आकारला जातो. त्यामुळे थकबाकीदारांना मुद्दलापेक्षा अधिकचे पैसे भरावे लागतात. वाढलेला कर बघून नागरिक आश्चर्यचकीत होत आहेत. व्याजदर टाळण्यासाठी वेळीच कराचा भरणा करणे आवश्यक आहे.१५ दिवसानंतर सुरू होणार जप्तीची कारवाई३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली ९० टक्क्याहून अधिक करण्याचे उद्दिष्ट नगर परिषदेने ठेवले आहे. काही थकबाकीदारांकडे मागील तीन ते चार वर्षांपासून कर थकीत आहे. दरवर्षी व्याज बसत असल्याने थकबाकी कराचा आकडा वाढतच चालला आहे. १५ दिवसानंतर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचे नियोजन नगर परिषदेने केले आहे. त्यासाठी सर्वप्रथम संबंधित व्यक्तीला नोटीस बजावण्याचे काम नगर परिषद करीत आहे, अशी माहिती कर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
केवळ ३५ टक्के कर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:00 AM
पाणीपट्टी कराची स्वतंत्र वसुली केली जाते. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये आहे. त्यापैकी ४५ लाख ७ हजार ४८१ रुपये वसुली झाली आहे. नगर परिषदेला करांच्य माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग नगर परिषद स्वत:च्या आवश्यकतेप्रमाणे खर्च करू शकते. त्यामुळे या करांना विशेष महत्त्व आहे.
ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषदेतील स्थिती । ९० टक्क्यापर्यंत वसुली करण्याचे उद्दिष्ट