लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील दिना धरणात सद्य:स्थितीत केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शेतकºयांनी पाण्याचा जपून वापर न केल्यास धानपीक अडचणीत येण्याची शक्यता आहे.दिना धरणातील पाण्याने चामोर्शी तालुक्यातील सुमारे ४० किमी अंतरावरील शेतजमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याने हजारो हेक्टर शेतजमिनीला जलसिंचन होते. चामोर्शी तालुक्यासाठी दिना धरण वरदान ठरले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे सदर तलाव पूर्णपणे भरला नाही. त्याचबरोबर धानशेतीला नियमित कालावधीच्या अगोदरच पाणी सोडावे लागले. जवळपास एक महिन्यापासून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जलसाठा कमी होत चालला आहे. सद्य:स्थितीत तलावात केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.चामोर्शी तालुक्यातील बहुतांश शेतकरी जड धानाची लागवड करतात. जड धानाला आणखी जवळपास एक महिना पाणी द्यावे लागणार आहे. यानंतर पाऊस न झाल्यास जलसाठ्यात वाढ होणार नाही. त्यामुळे पुन्हा एक महिना पाणी पुरणे अशक्य आहे. परिणामी एका पाण्याने धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकºयांनी काटकसरीने नियोजनबद्ध पाण्याचा वापर केल्यास सर्व शेतीला शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होईल.पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन सिंचन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने शेतीला पाणी देणे सुरू केले आहे. सिंचन विभागाच्या नियोजनाला शेतकºयांनीही सहकार्य करावे, अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन दिना प्रकल्पाचे शाखा अभियंता दि.वी. लांडगे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.दिना धरणात केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शेवटपर्यंत धानपिकाला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी शेतकºयांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, अन्यथा धानपीक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.- आर.एन. ढुमणे, सहायक अभियंता, दिना प्रकल्प सिंचन विभाग
दिना धरणात केवळ ४५ टक्केच जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:52 PM
जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील दिना धरणात सद्य:स्थितीत केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
ठळक मुद्देकाटकसरीने वापर करा : सिंचन विभागाकडून पाण्याचे नियोजन