शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

केवळ ५७ शेतकऱ्यांची सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:46 AM

वडसा-गडचिरोली या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली वाढल्या असताना शेतकरी मात्र मिळणाऱ्या मोबदल्यासाठी समाधानी नाहीत. त्यामुळे गडचिरोली उपविभागातल्या ७ गावांमधील प्रकल्पबाधित १७५ पैकी फक्त ५७ शेतकऱ्यांनीच या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास सहमती दर्शविली आहे.

ठळक मुद्देवडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग : दर निश्चितीत भेदभाव होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा-गडचिरोली या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली वाढल्या असताना शेतकरी मात्र मिळणाऱ्या मोबदल्यासाठी समाधानी नाहीत. त्यामुळे गडचिरोली उपविभागातल्या ७ गावांमधील प्रकल्पबाधित १७५ पैकी फक्त ५७ शेतकऱ्यांनीच या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे प्रशासनापुढे अडचणी वाढल्या आहेत.या रेल्वेमार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्या दर द्यावा याबाबतच्या वाटाघाटी करण्यासाठी गुरूवारी गडचिरोली एसडीओ कार्यालयात तिसऱ्यांदा बैठक ठेवली होती. मात्र शासनाकडून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याबद्दल गडचिरोली, गोगाव आणि लांजेडा येथील भूधारकांनी सहमती पत्र दिले नाही.गडचिरोली उपविभागांतर्गत येणाऱ्या ७ गावांमधील ५८.५०६ हेक्टर जमीन या प्रकल्पात रेल्वे मार्ग व रेल्वे स्थानकासाठी जाणार आहे. त्यात काटली येथील ८.४६ हेक्टर, साखरा ६.३६ हे., महादवाडी ६.३६ हे., अडपल्ली ३.९९ हे., गोगाव ६.६७ हे., गडचिरोली १.९८ हे. आणि लांझेडा येथील २४.६ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. गडचिरोली आणि आसपासच्या गावातील लोकांना बाजार भावानुसार शासन जमिनीचे दर देत नसल्यामुळे ते जमीन देण्यास विरोध दर्शवीत आहेत अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये वाटाघाटी फिस्कटल्या. गुरूवारी तिसऱ्या बैठकीतही ज्यांनी सहमती पत्र दिले नाही त्यांना तुम्ही दुसरीकडे दाद मागण्यासाठी मोकळे आहात असे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कनिष्ठ अधिकाºयाने सांगितले.६ जूनला जमिनीची नोंदणीगडचिरोली एसडीओ कार्यालयात गुरूवारी झालेल्या बैठकीत गडचिरोली, लांझेडा, काटली, साखरा, महादवाड़ी, गोगाव आणि अडपल्ली येथील भूधारकांना बोलविण्यात आले होते. त्यात काटलीतील ८, साखरा येथील २३, महादवाडीतील १८ आणि अडपल्लीतील ८ भूधारकांनी आपले ने सहमतीपत्र एसडीओ कार्यालयाकडे सोपविले. त्यांच्या जमिनीची नोंदणी येत्या ६ जूनला होऊन शेतकऱ्यांना चेकने त्यांचा मोबदला दिला जाणार आहे. या बैठकीला नायब तहसीलदार एम.एन. शेंडे, अव्वल कारकून वी.सी. येरमे यांच्यासह भूमि अभिलेख अधिकारी उपस्थित होते. एसडीओ सचिन ओम्बासे इतर बैठक असल्यामुळे काही वेळातच निघून गेले.रेल्वेऐवजी आधी धरण करायावेळी पत्रकारांशी बोलताना गोगावच्या नागरिकांनी आम्हाला विस्थापित करणारी हे रेल्वे आमच्या काही कामाची नाही. त्याऐवजी अनेक वर्षांपासून रखडलेले तुलतुली धरणाचे काम आधी पूर्ण करावे, अशी मागणी केली. हे धरण पूर्ण झाल्यास किमान शेतीला पाणी मिळू शकेल, असे शेतकरी म्हणाले.शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यातलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा-गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गात जमिनी जाणाऱ्या गोगाव येथील शेतकऱ्यांनी वाटाघाटीसाठी आयोजित तिसºया बैठकीत संमतीपत्र देण्यास नकार दिला. लगतच्या अडपल्ली या गावासाठी लागू केलेले ७४ लाख रुपये प्रतिहेक्टरचे दर आम्हालाही द्या, अन्यथा जमीन अधिग्रहण करू देणार नाही, असा इशारा तेथील शेतकऱ्यांनी दिला आहे.यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना गोगाव येथील १७ शेतकऱ्यांनी सांगितले की, अडपल्ली या गावाला ७४ लाखांचा दर, महादवाडीला ६० लाख असे दर निश्चित केले असताना गोगावला मात्र कोरडवाहू शेतीसाठी १९ लाख तर ओलिताच्या शेतीसाठी २९ लाख प्रतिहेक्टर असा दर प्रशासनाने निश्चित केला. मात्र हा दर आम्हाला मान्य नाही. आधीच या प्रकल्पामुळे काही शेतकरी भूमीहिन होणार आहेत. दुसरीकडे शेती घेण्याचा विचार केला तरी या दरात शेती मिळत नाही. मग आम्ही जगावे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला.गोगाव आणि अडपल्ली या दोन्ही गावांची शेती लागूनच आहे. असते असताना दोन्ही गावातील लोकांच्या जमिनीच्या दरात एवढी तफावत कशी? आमच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देऊन न्याय द्यावा आणि आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंती गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पत्रपरिषदेला नंदलालजी लाडे, दिवाकर म्हशाखेत्री, नक्टूजी शेंडे, यशवंत म्हशाखेत्री, नयन फुलझेले, उपेंद्र फुलझेले, सुधीर फुलझेले, तेजराम भोयर, आनंद चापले, दिनकर चौधरी, खुशाल खेवले, हिरामण भरडकर, ज्योती जुमनाके, संगीता मंगर, अभयपुरी मुलताने, श्यामसुंदर म्हशाखेत्री शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे