गडचिराेली : काेराेनाच्या संंसर्गामुळे अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले. काही कुटुंबांतील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबावर माेठा आघात झाला; तर अनेक लहान मुलांचे मातृपितृ छत्र हरपल्याने बालके निराधार झाली. काेराेनाने लहान मुलांचा एकमेव आधार हिरावून गेल्याने पाल्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. गडचिराेली जिल्ह्यात जिल्हास्तरीय कृतिदल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले आहे. तरीसुद्धा बालकांना साेयीसुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे.
काेविड महामारीमुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला, अशा कुटुंबातील बालकांची यादी तयार करून कृतिदलासमोर ठेवण्यात आली आहे. त्यांना अन्नधान्य, आराेग्यविषयक सुविधा, कायदेविषयक संरक्षण तसेच समुपदेशन यांसह विविध याेजनांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ‘चाईल्डलाईन’च्या माध्यमातून मदतही पाेहाेचविली जाणार आहे.
बाॅक्स ....
ज्येष्ठांचे अनेक प्रश्न
- काेराेनामुळे एकुलत्या एका विवाहित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांचा सांभाळ काेण करणार, असा प्रश्न अनेक ज्येष्ठांसमाेर निर्माण झाला आहे.
- अनेक ज्येष्ठांसमाेर नातवंडांच्या संगाेपनाची जबाबदारी आल्याने कुटुंबाचे पालनपाेषण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर आहे. तसेच आपल्या पश्चात त्यांचे काय हाेईल, अशीही चिंता त्यांना सतावत आहे.
बाॅक्स ....
मुलांसह ज्येष्ठांचीही जबाबदारी घ्यावी
काेराेनामुळे अनेक कुटुंबातील प्रमुखांचे निधन झाले. अशा कुटुंबातील बालके व ज्येष्ठ व्यक्ती निराधार झाली. लहान मुलांच्या संगाेपनाची जबाबदारी ज्येष्ठ नागरिकांवर आल्याने त्यांच्यावरील ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शासनाने केवळ लहान मुलांच्या संगाेपनाची जबाबदारी न घेता निराधार, ज्येष्ठ व्यक्तींचीही जबाबदारी घेऊन त्यांना आवश्यक मदत करणे गरजेचे आहे. तेव्हाच संबंधित कुटुंबाला याेग्य प्रकारे आधार मिळून पुनर्वसन हाेऊ शकेल, असे सामाजिक कार्यकर्ते भाऊराव मानकर यांनी म्हटले आहे.