लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जवळपास दाेन महिन्यांच्या कालावधीनंतर २४ डिसेंबरला गडचिराेली व अहेरी आगारातून प्रत्येकी एक बस सुरू झाली. त्यानंतर, बसेसची संख्या वाढेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, कर्मचारीच रुजू हाेत नसल्याने दाेन्ही आगारांना प्रत्येकी एकच बस चालवावी लागत आहे.एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगारवाढ दिल्यानंतर, राज्यातील बरेच कर्मचारी आता रुजू हाेऊ लागले आहेत. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अजूनही आंदाेलनच करीत आहेत. पगावाढ नकाे, तर विलीनीकरणच करा, या मागणीवर अडून बसले आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे एकच बस साेडावी लागत आहे.
या मार्गावर बसेस सुरूगडचिराेली आगाराची बस गडचिराेली-देसाईगंजसाठी साेडली जात आहे, तर अहेरी आगाराची बस अहेरी-एटापल्लीसाठी साेडली जात आहे. या दाेनच मार्गांवर बस सुरू आहेत.
मेकॅनिक करीत आहेत देखभालचालक व वाहक हे कामबंद आंदाेलन करीत आहेत. मात्र, मेकॅनिक सुरुवातीपासूनच कामावर आहेत. आंदाेलनामुळे मागील दाेन महिन्यांपासून बसेस जाग्यावरच उभ्या आहेत. या कालावधीत बसेसची देखभाल मेकॅनिक ठेवत आहेत. त्यामुळे आंदाेलन जरी सुरू असले तरी वाहनांची स्थिती अतिशय चांगली आहे.
एसटी ही केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नसून येथील जनतेची आहे. एसटीला दरवर्षी ताेटा हाेते. शासन स्वत:कडचे पैसे भरून एसटी चालवित आहे. शासनाकडील पैसा जनतेच्या घामाचा आहे. मात्र, याच जनतेला कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. राज्य शासनाने पदभरतीची जाहिरात काढावी. लाखाे बराेजगार युवक एसटीची धुरा सांभाळण्यासाठी तयार आहेत. - शिव सरकार, युवक
एसटी बुडाल्यावर कशाचे विलीनीकरण करणारएसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनामुळे एसटी बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी बुडाल्यानंतर कशाचे विलीनीकरण करणार, याचा विचार कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे. मात्र, विलीनीकरणाचे भूत एसटी कर्मचाऱ्यांच्या डाेक्यात शिरले आहे. हे भूत लवकर बाहेर निघणे आवश्यक आहे. - सुनील परचाके, युवक