लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी तथा लोकसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी (दि.१८) निवडणुकीची अधिसूचना जारी केली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सकाळी ११ वाजतापासून उमेदवारी अर्ज वाटप आणि दाखल करण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ६ इच्छुकांनी केवळ अर्ज नेले, परंतू कोणीही नामांकन दाखल केले नाही. हा दिवस कोरडा गेल्याने आता उर्वरित ४ दिवसात किती नामांकन दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना प्रशासकीयस्तरावर आतापर्यंत झालेल्या तयारीबाबत सांगितले. निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे यासाठी यंत्रणा दक्ष आहेच, परंतू नागरिकांनीही कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निष्पक्षपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे आणि ते स्वीकारणे या दोन्ही गोष्टी गुन्ह्यात मोडतात. निवडणुकीसंदर्भात कोणत्याही तक्रारीसाठी १९५० हा कॉल सेंटरचा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला असून तो २४ तास सुरू राहणार आहे. त्यावर आलेल्या तक्रारी संबंधितांना पाठविल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारूमुक्त निवडणुकीसाठी आणखी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी पोलिसांना मुक्तिपथ अभियानाचे कार्यकर्ते मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिला जात आहे. दि.२० पर्यंत हे प्रशिक्षण चालणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळ्या रांगा राहतील. याशिवाय प्रत्येक विधानसभा मतदार संघात एका मतदान केंद्रावर संपूर्ण महिला अधिकारी-कर्मचारी राहतील. महिलावर्गाने जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिंग यांनी केले आहे. दिव्यांग मतदारांसाठी ३०० ग्रामपंचायतींमध्ये व्हिल चेअर उपलब्ध राहणार आहेत. सध्या रॅली, दिंडीतून मतदान जागृती सुरू आहे.पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-दुबे, नायब तहसीलदार एस.के.चडगुलवार आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील ८६६४ कर्मचाऱ्यांची ड्युटीनिवडणुकीसाठी जिल्ह्यात ९३० मतदान केंद्र राहणार आहेत. त्यावर एकूण ८६६४ अधिकारी-कर्मचाºयांची ड्युटी लागणार आहे. त्या गडचिरोली विधानसभा मतदार संघात ३५६२, आरमोरी मतदार संघात २७१८ तर अहेरी मतदार संघात २३८४ कर्मचारी राहणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण संबंधित विधानसभा मतदार संघात सुरू आहे.भाजपच्या उमेदवारीची उत्सुकता कायमकाँग्रेसमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चार जण इच्छुक असतानाही उमेदवारी जाहीर करण्यात काँग्रेसने बाजी मारली. डॉ.नामदेव उसेंडी यांचे नाव राज्यातील पहिल्याच यादीत जाहीर झाल्याने त्यांचे कार्यकर्ते निश्चिंत झाले. त्या तुलनेत भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त नसतानाही नाव जाहीर करण्यास वेळ लागत असल्याने भाजपच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांचाही जीव टांगणीला लागला आहे. विद्यमान खासदार अशोक नेते यांचे नाव निश्चित झाले असताना आमदार डॉ.देवराव होळी यांनी लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा दर्शविल्याने पक्षाकडून दोन्ही नावांची चाचपणी सुरू होती. मतदार संघाचा व्याप, जनसंपर्क, कार्यशैली या बाबींची पडताळणी करून पक्षाने उमेदवारी निश्चित केली असून मंगळवारी नाव जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.तेंदुपत्ता लिलाव अजूनही वांद्यातचजिल्ह्यातील पेसाअंतर्गत गावांचे अर्थकारण चालणाºया तेंदूपत्ता लिलावावर आधीच अवकळा आली असताना आचारसंहितेमुळे लिलावही थांबविण्यात आले आहेत. सदर लिलावांना आचारसंहितेतून वगळावे अशी शिफारस करून जिल्हाधिकाºयांनी मुख्य सचिव तथा राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे. परंतू अद्याप त्याबाबत कोणतीही सूचना आलेली नसल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी सांगितले.
नामांकनासाठी आता केवळ चार दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:38 PM
निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी तथा लोकसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी (दि.१८) निवडणुकीची अधिसूचना जारी केली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सकाळी ११ वाजतापासून उमेदवारी अर्ज वाटप आणि दाखल करण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ६ इच्छुकांनी केवळ अर्ज नेले, परंतू कोणीही नामांकन दाखल केले नाही. हा दिवस कोरडा गेल्याने आता उर्वरित ४ दिवसात किती नामांकन दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देपहिल्या दिवशी शून्य : ६ जणांनी केवळ अर्ज नेले, कॉल सेंटर सक्रिय