आॅनलाईन लोकमतगडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाड्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांचे संघटनात्मक जबादारीकडे दुर्लक्ष होत आहे. अनेकांनी आपली कार्यकारिणीही गठित केली नाही. भाजपच्या संघटनेत केवळ पदे घेऊन चालणार नाही. पदाधिकाºयांनी जबाबदारीने आपले काम केलेच पाहिजे, अशा सूचना भाजपचे प्रदेश संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.गडचिरोली येथील केमिस्ट भवनात भाजपच्या विविध आघाड्या प्रमुखांची व पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रदेश सदस्य उषा भालेराव, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार, जि.प. कृषी सभापती नाना नाकाडे, राजू जेठाणी, स्वप्नील वरघंटे, महिला आघाडीच्या ताराबाई कोटांगले, रेखा डोळस, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगराध्यक्ष शालू दंडवते आदी उपस्थित होते.जि.प., पं.स., नगर परिषद, किसान, अल्पसंख्याक व दलित आदी आघाड्याची कार्यकारीणी तत्काळ पूर्ण करावी, असे डॉ. कोठेकर यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुकास्तरावर कार्यालय सुरू करून पक्षाचे संघटन मजबूत करावे, असे सांगितले. दरम्यान संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली.
केवळ पद घेऊन चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:25 PM
भारतीय जनता पार्टीच्या विविध आघाड्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्देभाजपची बैठक : उपेंद्र कोठेकर यांच्या पदाधिकाºयांना कडक सूचना