लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीतील बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. साेमवारपासून याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत.
साेमवारी अर्ज वाढणार
- एसटीने शुक्रवारी परिपत्रक काढले. शनिवार व रविवार आल्याने अपीलचे फारशे अर्ज आले नाहीत. बडतर्फ झालेल्यांचे ७ तर सेवा समाप्ती झालेल्यांचे २ अर्ज आले आहेत. त्यांच्यावर लवकरच निर्णय हाेणार आहे. साेमवारपासून अर्जांची संख्या वाढण्याची आहे.
अशी आहे रुजू हाेण्याची प्रक्रिया - ज्या कर्मचाऱ्यांवर काेणतीही कारवाई झाली नाही. ते आगारप्रमुखाकडे साधा अर्ज करतील. त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.
- ज्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली आहे. त्यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे अपील करायचे आहे. याबाबतचा निर्णय समिती घेईल. मात्र कारवाई मागे घेण्याचे सरकारचे निर्देश असल्याने अपीलमध्ये कारवाई मागे घेतली जाणार आहे.
एसटीच्या विलीनीकरणाचा विषय न्यायालयात आहे. न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हा लागेल. न्यायालय जाे निकाल देईल ताे निकाल सर्वांनाच लागू असेल. त्यामुळे निकालाची वाट न बघता एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. सरकारच्या आदेशानुसार कारवाई मागे घेतली जाईल. -अशाेककुमार वाडीभस्मे, विभाग नियंत्रक, गडचिराेली