लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने १४ ते २७ जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे.
आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी झाली आहे. याकरिता पाल्यांच्या मोफत प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
या संकेतस्थळाला भेट द्या पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी स्टुडंट महाराष्ट्र या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून मोफत प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी केले आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाप्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.