लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजप-सेना युती सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विद्यमान सरकार हे हुकूमशाही व हिटलरशाहीचे सरकार आहे. या हुकूमशाहीला आमचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनही उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री फौजीया खान यांनी गडचिरोली येथे पत्रपरिषदेत दिली.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने १७ जुलैला नागपूर येथे संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व नियोजनाबाबत रविवारी गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने फौजीया खान यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, जि.प.च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, महिला आघाडी अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युनुस शेख आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना फौजीया खान म्हणाल्या, भारतीय संविधानाच्या बचावासाठी राकाँच्या वतीने जम्बो कार्यक्रम आखण्यात आला आहे. यापूर्वी दिल्ली व मुंबई येथे पक्षाचे सर्व नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. नागपूर येथे १७ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते मनुस्मृती व ईव्हीएम मशीनची होळी करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हुकूमशाही सरकारविरोधात आंदोलन उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:59 PM
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजप-सेना युती सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विद्यमान सरकार हे हुकूमशाही व हिटलरशाहीचे सरकार आहे. या हुकूमशाहीला आमचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सरकारच्या विरोधात आंदोलनही ...
ठळक मुद्देफौजीया खान यांची माहिती : राकाँतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाची जय्यत तयारी