लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सर्वच २४ शासकीय आश्रमशाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांवर तब्बल ५० तासिका तत्त्वावरील मानधन शिक्षकांचे आदेश प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी सोमवारी काढले. त्यामुळे आता आदेश मिळालेले हे ५० प्रशिक्षित मानधन शिक्षक संबंधित आश्रमशाळांवर रूजू होणार आहेत.यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षक सात, माध्यमिक शिक्षक २५, प्राथमिक १६ व पदवीधर शिक्षकांचे दोन असे ५० आदेश काढण्यात आले. गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी व देसाईगंज या सहा तालुक्यात २४ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. यामध्ये कारवाफा, रांगी, सोडे, पोटेगाव, कुरंडीमाल, सावरगाव, अंगारा, भाडभिडी, घाटी, गोडलवाही, ग्यारापत्ती, कोटगूल, मार्र्कंडादेव, मुरूमगाव, मसेली, रेगडी, पेंढरी, येरमागड, येंगलखेडा, सोनसरी, गडचिरोली आदी आश्रमशाळांचा समावेश आहे. सदर आश्रमशाळांमध्ये एकूण जवळपास पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.अनेक आश्रमशाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक, पदवीधर व उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर प्रकल्प कार्यालयाच्या वतीने दरवर्षी तासिका तत्त्वावरील मानधन शिक्षकांची नियुक्ती केली जाते. मागील दोन वर्ष मानधन शिक्षकांच्या नियुक्तीत बराच विलंब होत होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक सत्रात प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी लगबगीने कार्यवाही करून मानधन शिक्षकांचे आदेश काढले.गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या एकूण ५० जागा रिक्त आहेत. सदर रिक्त पदांवर मानधन शिक्षकांसाठी उमेदवारांकडून एकूण १९२ अर्ज प्राप्त झाले. यातून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने रिक्त असलेल्या ५० जागांवर मानधन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या तीन ते चार व त्यापेक्षा अधिक आश्रमशाळांमध्ये मानधन शिक्षक म्हणून काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे.गडचिरोली प्रकल्पातील अनेक आश्रमशाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये सफाईगार, कामाठी, शिपाई व अन्य पदांचा समावेश आहे. या पदांसाठी प्रकल्प अधिकारी डॉ.ओंबासे यांनी ७४ उमेदवारांचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या पदावर मानधन तत्त्वावर काम करण्याकरिता १५० नव्या उमेदवारांचे अर्ज प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाले. नियुक्ती प्रक्रियेमध्ये आश्रमशाळांमध्ये काम केलेल्या अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे.असे आहे तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन दरदोन वर्षांपूर्वी आश्रमशाळांमध्ये कार्यरत तासिका तत्त्वावरील शिक्षकांना फारसे मानधन मिळत नव्हते. मात्र आता आदिवासी विकास विभागाने निर्णय घेऊन मानधन शिक्षकांच्या तासिकांचे दर वाढविले आहे. त्यामुळे मानधनावर काम करणाºया उमेदवारांची संख्या वाढली आहे. सद्य:स्थितीत उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रतितास १५०, माध्यमिक शिक्षकांना १४०, पदवीधर शिक्षकांना १४० व प्राथमिक शिक्षकांना १२५ रूपये याप्रमाणे मानधन दिले जात आहे. शिक्षकेत्तर कर्मचाºयांना मासिक नऊ हजार रूपये मानधन दिले जात आहे.
मानधन शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:10 PM
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सर्वच २४ शासकीय आश्रमशाळेत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांवर तब्बल ५० तासिका तत्त्वावरील मानधन शिक्षकांचे आदेश प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी सोमवारी काढले. त्यामुळे आता आदेश मिळालेले हे ५० प्रशिक्षित मानधन शिक्षक संबंधित आश्रमशाळांवर रूजू होणार आहेत.
ठळक मुद्देप्रकल्प अधिकाऱ्यांची कार्यवाही : मानधनाचे दर वाढल्याने गतवर्षीपेक्षा यंदा अर्जात वाढ