लोकमत न्यूज नेटवर्कमुलचरा : कृषी विभागाच्या मार्गदर्शनात स्थापन केलेल्या सुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीने सेंद्रीय दशपर्नी अर्क (किडनियंत्रक) तयार केले आहे. या किडनियंत्रकाचे वितरण तालुक्यातील शेतकºयांना करण्यात आले.पिकांवर किड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बरेचसे शेतकरी दुकानातून खरेदी केलेली कीटकनाशके फवारणी करतात. या कीटकनाशकांचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तसेच शेतीचा उत्पादन खर्चही वाढतो. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. यावर उपाय म्हणून सुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्य शेतकऱ्यांनी विविध झाडांच्या पानांपासून दशपर्नी अर्क तयार केले. उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे, कृषी अधिकारी एस.बी. निंबाळकर, कृषी सहाय्यक दीपक बलकर यांच्या उपस्थितीत या अर्काचे वितरण करण्यात आले.सदर अर्क खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी प्रतिमाह एक हजार लिटर दशपर्नी अर्क तयार केले जाईल. तसेच यावर्षी २३ हजार पिवळे-निळे चिकट सापळे तयार केले जातील, अशी माहिती शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रविंद्रनाथ ताती व सचिव मिलन बिश्वास यांनी दिली.कीटकनाशकांचा मानवी आरोग्यावर दुष्परिणामकीटकनाशकांच्या वापरामुळे जलप्रदूषण होते. शेतातील गांढूळ, साप, बेडूक व इतर नैसर्गिक किडनियंत्रण करणारे अनेक मित्र कीटक मरण पावतात.शेतात वापरलेल्या कीटकनाशकामुळे शेततळ्यातील मासे मरण पावतात. कीटकशाकांचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होते. कीटकनाशकाचे अंश धान्यात राहत असल्याने अन्नच विषमय होत असल्याने संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे दशपर्नी अर्काचा वापर करणे फायद्याचे ठरू शकते, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केले.असे तयार केले जाते अर्ककडुनिंब, सीताफळ, रई, करंज, एरंडी, बेशरम, गराडी, पपई, टनटनी, लाल कन्हेर, गोमुत्र, गाईचे शेण इत्यादी पासून अर्क तयार केले जाते. शेतकरी उत्पादक कंपनीने ४०० लिटर अर्क तयार केले. हे अर्क केवळ अडीच रूपये दराने शेतकऱ्यांनी विकले. कीटकनाशकांच्या तुलनेत सदर अर्क अतिशय कमी किमतीत तयार होते. त्यामुळे उत्पादन खर्चात कपात होते.
शेतकऱ्यांनी तयार केले सेंद्रीय किडनियंत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:53 AM
पिकांवर किड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बरेचसे शेतकरी दुकानातून खरेदी केलेली कीटकनाशके फवारणी करतात. या कीटकनाशकांचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तसेच शेतीचा उत्पादन खर्चही वाढतो. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत येतो.
ठळक मुद्देसंडे अँकर । केवळ अडीच रूपये दराने शेतकऱ्यांना वितरण; मुलचेरा शेतकरी उत्पादक कंपनीचा उपक्रम