लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शासकीय स्तरावरुन देयके अदा करणाऱ्या आस्थापनांना टीडीएस अंतर्गत नवा वस्तू व कर कायद्यान्वये कपात आवश्यक झाली आहे. यासाठी २० जुलै रोजी नोंदणी सुरु होत आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्याकरिता १९ जुलै रोजी बुधवारला दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १ जुलै २०१७ पासून वस्तू सेवा कर कायदा लागू झालेला आहे. उपरोक्त कायद्याच्या कलम २४ व्हीआय आणि कलम ५१ नुसार टीडीएस कपातदार म्हणून पात्र सर्व शासकीय विभाग व आस्थापना यांना कायद्याखाली नोंदणी घेणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी घेवून देयके प्रदान करताना वस्तु व सेवा पुरवठा धारकांकडून २ टक्के टीडीएस कापून प्रत्येक महिना संपल्यानंतर १० दिवसाच्या आत शासकीय तिजोरित आॅनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक आहे. टीडीएसचा कर भरणा करुन विहित मुदतीत रिर्टन विवरण भरणे सुध्दा बंधनकारक आहे. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. होणाऱ्या कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक राज्य कर आयुक्त एस. आर. धोडरे यांनी केले आहे.
टीडीएस व जीएसटीवर कार्यशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:36 AM