शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

अतिवृष्टीने गडचिरोलीतील शेकडो गावे संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 5:18 PM

जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आधीच संपर्काच्या सुविधा कमी असताना दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेकडो गावे संपर्काबाहेर गेली आहेत.

गडचिरोली : जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आधीच संपर्काच्या सुविधा कमी असताना दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेकडो गावे संपर्काबाहेर गेली आहेत. प्रमुख नद्यांसह ठिकठिकाणच्या नाल्यांना, ओढ्यांना पूर आल्यामुळे ठेंगणे पूल पुराच्या पाण्याखाली गेले. त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात दोन दिवसात एका वृद्धासह युवकाला जलसमाधी मिळाली.मंगळवारी रात्री आरमोरीलगतच्या नाल्याला आलेल्या पुराजवळ आपली दुचाकी थांबवून मोबाईलवर बोलत असलेल्या मयूर वामन प्रधान (२३) या एलआयसी एजंट असलेल्या युवकाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. सोमवारी त्याचा मृतदेह सापडला. त्याआधी चामोर्शी तालुक्यातील घोटजवळच्या नाल्याच्या पुरात ऋषी तुकाराम तुंकलवार (६०) या वृद्धाला जलसमाधी मिळाली आहे.बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात १२१.४ मिमी पावसाची नोंद झाली. १२ पैकी ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात अवघ्या २४ तासात भामरागड तालुक्यात सर्वाधिक ३४२.५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीला महापूर येऊन पुराचे पाणी गावात शिरून जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला आहे. वीज पुरवठाही रात्रीपासून खंडित झाला आहे. यामुळे नदीपलिकडच्या शंभरावर गावांचा संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यात २६३.२ मिमी पाऊस झाल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्वांची मोठी तारांबळ उडाली. अतिवृष्टी झालेल्या इतरही तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळपर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटलेला होता.गडचिरोली शहराच्या अनेक खोलगट भागाला तलावाचे रूप आले आहे. मंगळवारी रात्री धो-धो पाण्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना सर्वांनाच मोठी कसरत करावी लागत होती. बुधवारी सकाळी ११ नंतर पावसाने थोडी उसंत घेतली. दहावी-बारावीचे विद्यार्थी पेपरपासून वंचितगडचिरोली जिल्ह्यात दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सुरू आहे. गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा व कुरखेडा या पाच ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. बुधवारी दहावीचा हिंदी तर बारावीचे गणित व संख्याशास्त्र तथा पीकविज्ञान हे पेपर होते. मात्र पावसामुळे अनेक मार्ग बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जे पोहोचले त्यांना गुडघ्यापेक्षा जास्त खोल पाण्यातून परीक्षा केंद्रांवर पोहोचावे लागले. चामोर्शी येथील शिवाजी हायस्कूल या बारावीच्या परीक्षा केंद्रावर ५ पैकी ३ विद्यार्थी अनुपस्थित होते. हीच परिस्थिती कमीअधिक प्रमाणात इतरही केंद्रांवर होती. ‘लोकबिहादरी’लाही फटकाप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांच्या भामरागडलगतच्या लोकबिरादरी प्रकल्पाचा परिसरही अतिवृष्टीने जलमय झाला होता. पुराने फुगलेल्या पर्लकोटा नदीचे पाणी बऱ्याच दूरपर्यंत पसरले होते. मंगळवारी रात्रभर प्रकल्पाच्या परिसरात जिकडे-तिकडे पाणी साचले होते. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हे पाणी ओसरले. या ठिकाणी परिसरातील आदिवासी नागरिक उपचारासाठी येत असतात. परंतू पावसाळ्यात दरवर्षी या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शंभरावर गावांचा संपर्क तुटतो. शासनाने पर्लकोटा नदीचे खोलीकरण करावे, जेणेकरून पुराची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा अनिकेत प्रकाश आमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.