शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

रेल्वेचे ओव्हर हेड ब्रेकर तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2016 12:55 AM

देसाईगंज रेल्वेस्टेशनचे निर्माणाधिन कामे युध्दपातळीवर सुरू असून या कामांनी वेग घेतला आहे.

वाहनाची जबर धडक : रेल्वे वाहतूक पोलीस नेमण्याची गरजदेसाईगंज : देसाईगंज रेल्वेस्टेशनचे निर्माणाधिन कामे युध्दपातळीवर सुरू असून या कामांनी वेग घेतला आहे. दरम्यान रेल्वेचे विद्युतीकरण होत असल्याने रेल्वे विभागाने लावलेले दोन्ही बाजुचे ओव्हर हेड ब्रेकर एक महिन्याच्या फरकाने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळे पूर्णत: तुटले आहेत. त्यामुळे येथे रेल्वे वाहतूक पोलीस नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.देसाईगंज रेल्वेस्टेशन हे देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. नॅरोगेज, ब्राडगेजमध्ये १९९३ ला रूपांतरीत झाले. तेव्हापासून बल्लारशहा ते गोंदिया या रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनच्या माध्यमातून रेल्वे वाहतूक सुरू आहे. गोंदिया ते चंद्रपूर या डिझेल इंजिन मार्गावर आता रेल्वे विभागातर्फे रेल्वेचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर होत असून त्यासाठी रेल्वे विद्युत खांब गोंदिया-चंद्रपूरपर्यंत उभारण्यात येणार असून विद्युत तार जोडणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी भूयारी व साध्या मार्गाच्या रेल्वेपटरी ओलांडून जाणाऱ्या वाहनांसाठी ओव्हर हाईट ब्रेकर लावण्यात आले आहेत. सदर ओव्हर लाईट ब्रेकर रेल्वेच्या नियमानुसार व ज्या उंचीवरून हायव्होल्टेज वायर रेल्वे इंजिनच्या निकषानुसार बसविण्यात आले आहेत. या संबंधाने वडसा रेल्वेच्या मुख्य फाटकावर एक महिन्याच्या आदी पूर्व दिशेच्या बाजुला ओव्हर हाईट ब्रेकर लावण्यात आले. परंतु २४ तासातच एका ट्रान्सपोर्ट वाहतूक ट्रकने ओव्हर हाईटच्या मध्यभागी ब्रेकरला धडक दिल्याने सदर ब्रेकर पूर्णत: वाकला. तसेच पश्चिम दिशेच्या बाजुला १५ दिवसांपूर्वी लावण्यात आलेले ओव्हर हाईट ब्रेकर सोमवारच्या रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वाकलेल्या अवस्थेत आहे. अशा प्रकारे रेल्वे विभागाने लावलेले दोन्ही ब्रेकर पूर्णत: निकामी झाले आहेत. रेल्वे फाटकाच्या पूर्व, पश्चिम दिशेला दर्शनी भागातच रेल्वे विभागाने सदर ब्रेकर लावावेत, जोपर्यंत भूयारी मार्ग सुरू होत नाही, तो पर्यंत सदर ब्रेकर लावू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)जीवितहानीची शक्यता बळावलीसदर लावलेले दोन्ही हाईट ब्रेकर एकदम रेल्वे फाटकाच्या जवळ असल्याने ट्रक चालकाला उंचीचा अंदाज येत नाही. त्यामुळे ट्रक पूर्णपणे पश्चिमेकडील ब्रेकरच्या जवळ गेल्यावर उंची जास्त असल्याने ब्रेकरमधून ट्रक जाऊ शकत नाही. परिणामी फाटकाजवळच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. जोराने धक्का लागल्यास शेकडो टन वजनाचा ब्रेकर खाली आल्यास जीवितहानीची शक्यता अधिक असते.