थोरात चौक ते नैनपुर मार्गावरील जय अम्बे कपडा बाजाराच्या ईमारतीचा अनाधिकृत बांधकाम तोडुन टाकण्याची नगर परिषदेने ११ फेब्रुवारी रोजी केली होती. दरम्यान वरील अनाधिकृत माळा तोडण्यासाठी गेले असता सदर ईमारत कुलुपबंद दिसल्याने अनाधिकृत बांधकाम तोडुन टाकण्याची धडक कारवाई थंडबस्त्यात ठेवण्यात आली. याच मार्गावर अनेक व्यावसायिकांची बांधकामे नालीवर करुन ईमारतीचा स्लॅब अर्धा अधिक रस्त्यावर बाहेर काढला आहे. या मार्गांवरुन जड वाहनांना आवागमन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किराणा व्यावसायिक चक्क रस्त्यावर जड वाहने उभी करुन किराणा माल उतरवत असल्याने या मार्गांवर नेहमीच तासनतास वाहतूक खोळंबत असल्याचे वास्तव असुन यामुळे या मार्गांवरुन आवागमन करणा-यांना नेहमीच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान मंगळवारी खाद्य तेलाने भरलेला ओव्हरलोड ट्रक रस्त्यावर आलेल्या स्लॅबला वाचवण्याच् या प्रयत्नात मार्गक्रमण करीत असताना वीज तारांची गार्डिंग ताेडली. माञ शार्ट सर्किट झाल्यामुळे फ्युज उडाल्याने मोठा अनर्थ टळला महावितरणचे अधिकारी संबंधित ट्रक चालकाच्याविरोधात देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले हाेते.
ओव्हरलोड ट्रकने तोडली वीज तारांची गार्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:38 AM