लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन व बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ आशिया बिसा यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागांतर्गत अहेरी तालुक्यातील १० व एटापल्ली तालुक्यातील १० अशा एकूण २० गावांमध्ये प्रयोगिक तत्वावर हवामान सुसंगत गाव प्रकल्प कृषी विकास व ग्रामीण विकास संस्थेमार्फत प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाची पाहणी व अवलोकन करण्याकरिता भामरागड तसेच अहेरीच्या प्रकल्प अधिकाºयांनी गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधला.सदर प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात तीन जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर १०० गावांमध्ये सुरु आहे. हवामान सुसंगत गाव तयार करणे हा प्रकल्पाचा उद्देश असून यात हवामानाचा अभ्यास करून त्याप्रमाणे पिके घेतली जातील व हवामानाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान कमी करून उपाययोजना केल्या जातील. सोबतच शासनाच्या विविध योजना गरीब आदिवासी शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करणे व एक सक्षम हवामान सुसंगत गाव तयार करणे हा प्रमुख उद्देश प्रकल्प राबविण्यामागे आहे.याअंतर्गत आदिवासींना एकत्र करून त्यांना विविध कृषी अवजारे, बीज, खते, औषधी, प्रशिक्षण, अभ्यास सहल तसेच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्यात आले साधारणत: आदिवासी शेतकºयांनी पारंपरिक शेतीपद्धतीकडून आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. जेणेकरून उत्पन्नात वाढ होऊन शेती खर्चात कपात होईल. प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी स्थानिक कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली यांच्याकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद व सहकार्य लाभले आहे.सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी प्रकल्प अधिकारी आदिवासी विभागाच्या अधिकाºयांनी प्रकल्प गावांना भेटी देऊन कामाची पाहणी केली. यात शेतकºयाला मिळत असलेले मार्गदर्शन, त्याला प्रकल्पातून झालेली मदत याविषयी आदिवासी शेतकºयांसोबत चर्चा केली.एटापल्ली तालुक्यातील गावांना भामरागड प्रकल्प अधिकारी मोरे व त्यांचे सहकारी धुर्वे, आत्राम उपस्थित होते. अहेरी तालुक्यातील गावांना अहेरीचे प्रकल्प अधिकारी लाटकर, पडघन, शर्मा यांनी भेटी दिल्या. याकरिता कृषी विकास व ग्रामीण संस्थेचे सागर मंचालवार यांनी सहकार्य केले.
प्रकल्पाच्या कामांचे अवलोकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 9:20 PM
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन व बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ आशिया बिसा यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागांतर्गत अहेरी तालुक्यातील १० व एटापल्ली तालुक्यातील १०
ठळक मुद्देहवामान सुसंगत प्रकल्प : अहेरी व एटापल्ली तालुक्यातील गावांना भेटी