शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

गोंडवानाकडून जमीन मोजणीच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने येथील गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या २०० एकर जमीन संपादनासाठी विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक तरतूद झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्यातून आरमोरी मार्गावरील गोगाव-अडपल्ली परिसरातील शेतकºयांची ...

ठळक मुद्देसर्च रिपोर्ट तयार होणार : गोगाव-अडपल्ली गावानजीक विद्यापीठासाठी संपादित करणार जमीन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने येथील गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या २०० एकर जमीन संपादनासाठी विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक तरतूद झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्यातून आरमोरी मार्गावरील गोगाव-अडपल्ली परिसरातील शेतकºयांची खासगी जमीन व शासकीय जमिनीच्या मोजणीचे काम सुरू केले असून या कामात गती आली आहे.भूमी अधिग्रहणासाठी प्रशासनातर्फे जमिनीचा सर्च रिपोर्ट काढण्याचेही काम सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठाला २०० एकर जमिनीची आवश्यकता आहे. जागेअभावी विद्यापीठाचा विकास व विविध भौतिक सुविधा रखडल्या आहेत. जमीन खरेदी करून संपादीत करण्यासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठाला पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानंतर कुलगुरू व कुलसचिवांनी वारंवार पाठपुरावा करून विद्यापीठाची अडचण शासनापुढे मांडली. त्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाच्या जागेसाठी ८९ कोटी ३ लाख रूपयांची तरतूद केली. त्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची खासगी जमीन विद्यापीठाला देण्याची मागणी केली होती. त्याअंतर्गत अडपल्ली-गोगाव परिसरातील १३ शेतकऱ्यांनी आपली ३५ एकर जमीन देण्याबाबचे संमतीपत्र विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केले आहे. आता निधीची तरतूद झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने जमीन संपादनाची कार्यवाही गतीने सुरू केली आहे.जमीन मिळाल्यानंतर या सुविधा होणारचंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २०११ मध्ये स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाशी एकूण २०५ महाविद्यालये संलग्नित आहेत. १५० ते २०० एकर जागा संपादीत झाल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त ग्रंथालय, शाखानिहाय अभ्यासक्रमाचे स्वतंत्र विभाग, प्रशासकीय भवन, कार्यालयीन विभाग, महाविद्यालय कॅम्पस व इतर सोयीसुविधा होणार आहेत. यासंदर्भात प्राथमिक स्वरूपाचे नियोजन विद्यापीठ प्रशासनातर्फे झाले आहे.८९ कोटींचा निधी बीडीएसवर प्राप्त नाहीगोंडवाना विद्यापीठासाठी लागणारी २०० एकर जमीन खरेदी करून संपादीत करण्यासाठी राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपयांची तरतूद झाली आहे. मात्र सदर निधी विद्यापीठाच्या बीडीएसवर अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. जमीन संपादीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला तरतूद केलेला हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.