बाॅक्स .....
१८ वर्षे वयाेगटाचा प्रचंड प्रतिसाद
१ मे पासून १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात युवकांकडून माेठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आराेग्य विभागाकडून शेड्युल्ड टाकल्यानंतर काही मिनिटांतच पूर्णपणे बुक हाेत आहेत. युवकांचा प्रतिसाद लक्षात घेतला तर एकट्या गडचिराेली शहरात एकाच दिवशी दाेन ते तीन हजार लस देणे शक्य आहे. मात्र, प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० ते २०० च्या दरम्यान लसचे शेड्युल्ड टाकले जात आहे.
बाॅक्स ....
केंद्रावर सकाळी उसळते गर्दी
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे दुपारी लस घेण्यापेक्षा सकाळी ९ ते ११ वाजताची वेळ सर्वाधिक नागरिकांकडून निवडली जात असल्याने या वेळेवर लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळते. दुपारी १ वाजल्यानंतर मात्र गर्दी राहत नाही. एका बाटलीमधील औषधीने दहाजणांना लस दिली जाते. दहाजण जमा हाेईपर्यंत बाटली फाेडली जात नाही. त्यामुळे दहाजण जमा हाेईपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते.
काेट ....
युवकांकडून लस घेण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेक युवक लस घेण्यास तयार आहेत. मात्र, शेड्युल्ड बुक राहत असल्याने लस मिळत नाही. ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसीची अधिक गरज असताना ते घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे युवकांना दिल्या जाणाऱ्या लसीचे प्रमाण वाढवावे.
- आकाश राजुरकर
काेट ......
आम्ही पहिला डाेस काेव्हॅक्सिनचा घेतला हाेता. आता मात्र अनेक केंद्रांवर ही लस उपलब्ध नाही. लस घेऊन आता ४५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र आता ही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. आराेग्य विभागाने काेव्हॅक्सिन ही लससुद्धा उपलब्ध करून द्यावी. - रामदास लाेणारे
बाॅक्स ....
स्तंभ.......
आतापर्यंतचे लसीकरण - १,०७, १८६
पहिला डाेस - ८५,३३४
दुसरा डाेस - २१,८५२
आराेग्य कर्मचारी - ८,५६३
फ्रंटलाईन वर्कर - १८,२७७
४५ ते ६० वयाेगट - २३,८३४
१८ ते ४४ वयाेगट - ६,४०५
जिल्ह्याची लाेकसंख्या - १२,००,०००
लसीकरण - ८ टक्के
एकूण काेराेना रुग्ण - २५,४८५
एकूण काेराेना मुक्त रुग्ण - २०,७३५