लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिड्डीगुडम या गावात वीज कंपनीने वीजेचे खांब उभारले आहेत. त्यावर तार सुद्धा लावले आहे. मात्र या बाबीला आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना मात्र गावकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे गावातील वीज खांब केवळ देखावा ठरले आहेत.पिड्डीगुडम हे गाव एटापल्ली तालुका मुख्यालयापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. शेतात विजेचा पुरवठा करण्यासाठी पिड्डीगुडम या गावातून वीज खांब नेण्यात आले आहेत.गावातून वीज खांब गेल्याने नागरिकांनी वीज विभागाकडे घरी वीज जोडणी द्यावी, यासाठी अर्ज केले आहेत. मात्र आता दोन वर्षांचा कालावधी उलटूनही गावकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी वीज विभागाने लाखो रूपये खर्चून वीज खांब उभारले मात्र दोन ते तीन दिवसातच वीज पुरवठा खंडीत झाला. तेव्हापासून वीज पुरवठा सुरूच झाला नाही. एकीकडे देशातील एकही गाव व एकही घर विजेपासून वंचित राहणार नाही यासाठी वीज विभाग व शासन प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात येते. असे असले तर पिड्डीगुडममध्ये वीज जोडणी का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.विशेष म्हणजे, या गावातील बहुतांश नागरिक बीपीएलमध्ये मोडणारे आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोफत वीज पुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही वीज पुरवठा का केला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वीज पुरवठा करण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.अनेक गावांमध्ये अशीच स्थितीगावामध्ये वीज खांब उभारून ठेवले आहेत. मात्र वीज पुरवठा केला नाही, अशी एटापल्ली तालुक्यात अनेक गावे आहेत. वीज पुरवठा का केला नाही, असा प्रश्न वीज विभागाच्या अधिकाºयांना विचारल्यास मागणी नसल्याचे एकमेव उत्तर दिले जाते. मात्र प्रत्येक गावासाठीच हे उत्तर खरे नसल्याचे दिसून येते.
विजेचे खांब लावूनही पिड्डीगुडममधील अंधार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:35 AM
लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिड्डीगुडम या गावात वीज कंपनीने वीजेचे खांब उभारले आहेत. त्यावर तार सुद्धा लावले आहे. मात्र या बाबीला आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना मात्र गावकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे गावातील वीज खांब केवळ देखावा ठरले आहेत.पिड्डीगुडम हे गाव ...
ठळक मुद्देदोन वर्षांपासून वीज पुरवठाच नाही : खांब उभारणी व वीज तारांवरील लाखोंचा खर्च पाण्यात