शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

धान पीक रोवणी ४४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:29 PM

सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे३ हजार ९१० हेक्टरवर सोयाबीन : खरीपातील सर्व पिके मिळून ५३ टक्के लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या रोवणीचा हंगाम सर्वत्र जोमात सुरू आहे.खरीप पिकाचे जिल्ह्यात एकूण १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्र इतके क्षेत्र आहे. १ लाख ५३ हजार २२८ इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रात धानाचे पºहे टाकण्यात आले आहे. ३८ हजार १५ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी आतापर्यंत झाली आहे. २९ हजार १४ इतक्या हेक्टर क्षेत्रात यंदा आवत्या टाकण्यात आल्या आहेत. गडचिरोली तालुक्यात रोवणी व आवत्या मिळून एकूण ६ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रात, आरमोरी ७ हजार ७८० हेक्टर, चामोर्शी ९ हजार ५३६ हेक्टर, सिरोंचा १ हजार १७५ हेक्टर, अहेरी ४ हजार ८५७ हेक्टर, एटापल्ली ४ हजार ७५० हेक्टर, धानोरा १० हजार ४६४ हेक्टर, कोरची ६ हजार ३४३ हेक्टर, देसाईगंज ५ हजार १४० हेक्टर, मुलचेरा २ हजार १५० हेक्टर व भामरागड तालुक्यात २ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ४ हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ३१ हेक्टर, सिरोंचा तालुक्यात ५३ हेक्टर व भामरागड तालुक्यात ८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी आटोपली आहे. खरीपातील सर्व पिकांची मिळून एकूण ८८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ५३ आहे. १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सलग परसबागही फुलविली आहे. ४६८ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पीक रोवणीच्या कामास वेग आला आहे. त्यामुळे शेत मालकांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी सुरू आहे.१३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवडजिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी जिल्ह्यातील शेतकरी आता धानासोबतच कापूस पिकाकडेही वळले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, सिरोंचा, देसाईगंज तालुक्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती