लोकमत न्यूज नेवटर्ककोरेगाव/चोप : अत्यल्प खर्च, कमी मशागत, भरघोस उत्पादन व कमी कालावधीत धान पिकाचे उत्पादन घेता यावे, याकरिता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत देसाईगंज तालुक्यात चोप येथे गोविंदराव नागपूरकर यांच्या शेतात प्लास्टिक मल्चिंगद्वारे धानाची शेती करण्यात आली. सध्या मल्चिंगद्वारे लागवड केलेले धान पीक जोमात असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.धानाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये धानाचे पऱ्हे टाकून पाऊस आल्यानंतर चिखलणी करून रोवणी करावी लागते. यामध्ये रोवणीसाठी बराच खर्च येतो. त्यानंतर निंदणही काढावे लागते. या पध्दतीमध्ये वाफे तयार केली जातात. या वाफ्यांवर धानाचे बियाणे संयंत्राच्या सहाय्याने रोवले जातात. प्लास्टिक मल्चिंग पध्दतीमध्ये प्लास्टिक अंथरली जाते. सदर प्लास्टिकला काही प्रमाणात छिद्र पाडून त्यावर बियाणे टाकली जातात.धान पिकाच्या मशागतीकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर बेसुमार होत असल्याने उत्पादन खर्च लक्षात घेता शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने आत्मामार्फत प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून धान पीक लागवड करण्यात आली असून . आत्मांतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकामुळे शेती उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल यांचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होऊन नवी दिशा मिळेल, असे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र दोनाडकर यांनी सांगितले.
प्लास्टिक मल्चिंगवर लागवड केलेले धानपीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:27 AM
अत्यल्प खर्च, कमी मशागत, भरघोस उत्पादन व कमी कालावधीत धान पिकाचे उत्पादन घेता यावे, याकरिता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत देसाईगंज तालुक्यात चोप येथे गोविंदराव नागपूरकर यांच्या शेतात प्लास्टिक मल्चिंगद्वारे धानाची शेती करण्यात आली.
ठळक मुद्देखर्चात कपात : उत्पादनात होणार वाढ