शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

संस्थांच्या आडकाठीने अहेरीत धान खरेदी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:35 AM

आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाºयांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे.

ठळक मुद्देतीन केंद्र नाममात्र सुरू : अहेरी उपविभागात आतापर्यंत धानाची आवक नाही; कमिशनचा मुद्दा ऐरणीवर

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे. मात्र गतवर्षी खरेदी केलेल्या धानाच्या कमिशनच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अहेरी उपविभागात अद्यापही ३० धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत अहेरी उपविभागात महामंडळाच्या केंद्रावर धान खरेदी झाली नाही.आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने अहेरी उपविभागातील अंकिसा, आसरअल्ली, अमरादी या ठिकाणचे तीन धान खरेदी केंद्र बुधवारी व गुरूवारी रितसर उद्घाटन करून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी आदी पाच तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करून दरवर्षी लाखो क्विंटल धानाची खरेदी केली जाते. मात्र कमिशनच्या मुद्यावरून संस्थांनी आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदीच्या कामात पंचाईत केली आहे.अहेरी उपविभागातही धानाची कापणी व बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हलक्या प्रतीच्या धानाची मळणीही झाली आहे. मात्र महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे.आता संस्थाच नियुक्त करणार प्रतवारीकारआदिवासी विकास महामंडळाच्या सर्वच कार्यालयात पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. पदे रिक्त असल्याने महामंडळाला प्रतवारीकार नियुक्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनीच आपल्या संबंधित केंद्रांवर प्रतवारीकार (ग्रेडर)ची नियुक्ती करावी, असा निर्णय महामंडळाच्या संचालक बोर्डांनी घेतला आहे. त्यामुळे आता केंद्रांवर प्रतवारीकाराची नियुक्ती संस्थेकडूनच होणार आहे. प्रतवारीकाराला महामंडळातर्फे क्विंटलमागे पाच रूपये देण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रशिक्षण गडचिरोली येथे शनिवारी आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने महामंडळाचे नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी गडचिरोलीत येत आहेत. या प्रशिक्षण बैठकीत अहेरी उपविभागातील सहकारी संस्थांकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.२०१६-१७ च्या खरीप हंगामातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे धान खरेदीपोटीचे ४० टक्के कमिशन हुंडीमध्ये अदा करण्यात आले. तर खरेदी हंगाम आटोपल्यावर केंद्रावरून धानाची उचल झाल्यानंतर घटीतुटीचा हिशोब करण्यात आला. त्यानंतर संस्थांना ६ लाख १० हजार २५ रूपये इतके ६० टक्के कमिशन अदा करण्यात आले आहे. संस्थांची धान खरेदी हंगामातील दोन टक्के शासनाकडून मान्य केली जाते.- आशिष मुळेवार, उपप्रादेशिक व्यवस्थापक अहेरी