लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून १५ एप्रिलपर्यंत धानोरा तालुक्यातील सर्व केंद्रांवर धानाची खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शासनाच्या आदेशानुसार आता १६ एप्रिलपासून धानोरा व मुरूमगाव येथील धान खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.धान खरेदीसाठी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत होती. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे लक्षात आल्यावर धानाची खरेदी बंद करण्यात आली. धानाची विक्री करण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आधीच ऑनलाईन सातबारा व बँक पासबुकची झेरॉक्स व इतर दस्तावेज तयार केले होते. फक्त त्यांच्या धानाचा काटा होणे शिल्लक होता. १६ एप्रिलपासून खरेद प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने दस्तावेज असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप करण्यात आले.धानोरा व मुरूमगाव येथील धान खरेदी केंद्र १० दिवसांसाठी सुरू करण्यात आले असून रखरखत्या उन्हात शेतकºयांना आपल्या धानाची विक्री करावी लागत आहे. धानोरा येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत शासकीय गोदामात यावर्षीच्या खरीप हंगामात ९ डिसेंबर २०१९ पासून धान खरेदी सुरू करण्यात आली. येथील गोदाम धानाच्या पोत्यांनी पूर्णत: भरले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या मैदानात धानाची खरेदी सुरू करण्यात आली.अर्ध्याअधिक धानाची महामंडळाकडून उचल नाहीधानोरा येथील केंद्रावर आतापर्यंत १५ हजार क्विंटल पेक्षा अधिक धानाची खरेदी आविका संस्थेमार्फत करण्यात आली. यापैकी महामंडळाच्या वतीने केवळ २ हजार ३० क्विंटल धानाची उचल भरडाईसाठी करण्यात आली. अद्यापही येथे १३ हजार क्विंटल धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आला आहे. अवकाळी पावसाचे सावट असल्याने धानाची उचल लवकर करणे गरजेचे आहे. मात्र विलंब होत आहे. तालुक्यातील दुधमाळा, मोहली, सोडे येथे गोदाम नसल्याने उघड्यावरच धानाची खरेदी करण्यात येते.
धानोरा व मुरूमगावात धान खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:00 AM
धान खरेदीसाठी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत होती. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे लक्षात आल्यावर धानाची खरेदी बंद करण्यात आली. धानाची विक्री करण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी आधीच आॅनलाईन सातबारा व बँक पासबुकची झेरॉक्स व इतर दस्तावेज तयार केले होते. फक्त त्यांच्या धानाचा काटा होणे शिल्लक होता.
ठळक मुद्दे१६ एप्रिलपासून केंद्र पूर्ववत सुरू : कोरोनाच्या संचारबंदीने महिनाभर बंद होती खरेदी प्रक्रिया