चामोर्शी : यंदाच्या खरीप हंगामातील धानपिकाचे उत्पादन प्रति हेक्टरी किती होणार आहे, याचा अंदाज व आढावा घेण्याचे काम महसूल विभागाच्यावतीने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे एका शेतात प्रत्यक्ष धानाची कापणी व मळणी करून उत्पादनाचा अंदाज घेण्यात आला. चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी देवेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभागाच्यावतीने ११ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील भेंडाळा येथील शेतकरी प्रभाकर फकीरा बारसागडे यांच्या सर्व्हे नं. २३ मधील कोरडवाहू शेतात १० बाय १० मिटरची आखणी करण्यात आली. त्यानंतर धानपिकाची कापणी करून मळणीही करण्यात आली. शेवटी १० बाय १० मिटरच्या शेतीत ३.६०० किलोग्रॅमचे उत्पादन मिळाले. यावेळी चामोर्शीचे तहसीलदार अशोक कुमरे, नायब तहसीलदार डी. एम. दहिकर, मंडळ अधिकारी एम. एम. सरजारे, भेंडाळाचे तलाठी नवनाथ अतकरे, पं. स. सदस्य प्रमोद भगत, भेंडाळाचे सरपंच उंदीरवाडे, पोलीस पाटील म्हशाखेत्री, प्रभाकर बारसागडे आदींसह गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रति हेक्टरी धानपिकाच्या उत्पादनाचा प्रात्याक्षिकासह आढावा घेण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
धान उत्पादनाचे मूल्यमापन
By admin | Published: November 15, 2014 10:45 PM