शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

कृषी विभागाचे धान बियाणे निघाले बोगस

By admin | Published: October 29, 2015 2:04 AM

तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे तालुक्यातील येवली...

शेतकऱ्यांची फसवणूक : नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलन छेडणारगडचिरोली : तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे तालुक्यातील येवली व गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी अनुदान योजनेंतर्गत पुरविण्यात आले. मात्र १५० दिवसांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या धानपिकाला फुटवे आले नाहीत. कृषी विभागाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंदर्भात येवली येथील सेवा सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर, येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, काशिनाथ लटारे, लोमेश कोहळे आदींसह गोविंदपुरातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानभरपाई न दिल्यास कृषी विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर व येवलीच्या सरपंच गीता सोमनकर यांनी म्हटले आहे की, तालुका कृषी विभागाच्या वतीने महाबिज कंपनीचे सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे येवली व गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात आले. बियाणे पुरविताना सदर बियाणे १२५ ते १३० दिवसांच्या मुदतीचे असून या वाणातून भरघोस उत्पादन येते असे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र १४० ते १५० दिवसांचा कालावधी उलटूनही धानपिकाला फुटवे आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी या वाणाची मुळातच उगवण क्षमता फारच कमी आहे. अनेकदा पाणीपुरवठा करूनही धानाचे लोंब भरले नाही. उलट धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले आहे. येवली व गोंविदपूर गावातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून महाबिज धानबियाण्यांची लागवड आपल्या शेतात केली. यासाठी शेतकऱ्यांना रोवणी व मजुरीचा खर्च उचलावा लागला. मात्र आता बियाणे भरत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळ, रोग व बोगस बियाण्यांमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)