लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभागाचे कर्मचारीही शेतीबाबत सतर्क झाले आहेत. तालुका कृषी कार्यालय आरमोरीच्या वतीने ग्रामीण भागात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. वैरागड, मोहझरी, परसवाडी, खडकी, कोरेगाव, पिसेवडधा, नरोटी (माल), डार्ली, बोरी आदी गावात प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर गावाच्या मध्यभागी तसेच मोकळ्या जागेत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कृषी विभागाच्या वतीने बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी एस.पी.ढोणे, कृषी पर्यवेक्षक जी.एन.जाधवर, कृषी सहायक अमित केराम, कोविद मडकाम, लीना करंगामी आदी उपस्थित होते.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी एस.एस.ढगे यांनी सदर १० गावांमध्ये शेतकऱ्यांना बिज प्रक्रिया, लागवडीची पद्धती, यंदाच्या खरीप हंगामात होणारा पाऊस आदीबाबत मार्गदर्शन केले. आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेतीमशागतीची कामे सुरू आहेत. शेताची स्वच्छता करणे, शेतात सेंद्रिय खत टाकणे, काटेरी झाडेझुडूपे तोडणे आदी कामे सकाळच्या सुमारास शेतकरी व शेतमजूर करीत असताना दिसून येत आहे. काही शेतकरी पीक लागवडीसाठी पैशाची जुळवाजुळव करीत असतानाही पीक कर्जासाठी धावपळ सुरू आहे.अशी करा बिज प्रक्रियाएका बादलीमध्ये १० लीटर पाणी घ्यावे. मिठ द्रावण ढवळून घ्यावे. या द्रावणात धानबियाणे टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे द्रावणाबाहेर करून दोन ते तीन वेळा या बियाणाला स्वच्छ पाण्याने धुवावे. सदर बियाणे सावलीमध्ये २४ तास वाळवावे. प्रक्रिया केलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.
१० गावात धानबिज प्रक्रिया प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM
बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून तोट्याची शेती करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १० गावांमध्ये बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : महागडे धान बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी टाळण्याचे आवाहन