शेतकरी चिंतेत : इटियाडोहचे पाणी शेवटपर्यंत पोहोचलेच नाहीआरमोरी/वैरागड : हजारो हेक्टर क्षेत्रावरील धानपीक पाण्याअभावी करपायला लागले आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात करपा, तुडतुडा, गादमाशी आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊन तेथीलही पीक संकटात आले आहे. आरमोरी तालुक्याला इटियाडोह धरणाचे पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी आरमोरी तालुक्याच्या शेवटच्या भागापर्यंत या कालव्याचे पाणी अजुनही पोहोचले नाही. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे धानपीकाला पाणी देणे आवश्यक आहे. मात्र कालव्याचे पाणी येत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जवळपासचे नाले, तलाव, बोडी आटले आहेत. त्यामुळे पाणी देण्याची कोणतीच सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. अपुऱ्या पाण्याबरोबरच यावर्षी धानपिकावर विविध रोगांनीही आक्रमण केले आहे. जे पीक उभे आहे ते रोगांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जड धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना रोगांचे आक्रमण झाले आहे. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रोग व पाण्याअभावी धानपीक संकटात
By admin | Published: October 12, 2015 1:49 AM