लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील १२४ बचत गटांना दोन वर्षांपूर्वी धान रोवणी यंत्रांचे वितरण केले होते. दोन कोटी रूपये किमतीचे हे साहित्य देखभाल व दुरूस्तीअभावी बंद पडले असून पुन्हा पारंपरिक रितीनेच धानाची रोवणी करण्याकडे शेतकरीवर्ग वळला आहे.मानव विकास मिशन, जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत २०१३-१४ मध्ये ३७ व २०१५-१६ मध्ये ८७ शेतकरी बचतगटांना ९० टक्के अनुदानावर धान रोवणी यंत्रांचे वितरण करण्यात आले होते. अनुदानावर रोवणी यंत्र मिळत असल्याने बचतगटांनी सदर यंत्र मिळविण्यासाठी मोठी धावपळ केली होती. संबंधित यंत्राची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित बचतगटावरच सोपविली होती. सदर यंत्र आंध्रप्रदेशातून एका कंपनीमार्फत आणण्यात आले होते. मात्र या यंत्रांचे सुटे भाग गडचिरोली जिल्ह्यात मिळत नसल्याने तसेच त्याची दुरूस्ती करणारे कारागिरही मिळत नसल्याने बंद पडलेले धान रोवणी यंत्र सुरूच झाले नाही.यंत्रांचे वितरण झाल्यानंतर सदर बचतगट योग्य पद्धतीने यंत्र चालवित आहे काय? सदर यंत्र चालविताना कोणत्या अडचणी येत आहेत, या सर्व बाबी समजून घेण्यासाठी कृषी विभागाने लक्ष देणे आवश्यक होते. मात्र धान रोवणी यंत्र वितरित केल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहे. अल्पावधीतच काही बचतगटांमध्ये भांडण निर्माण झाले. त्यामुळे यंत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. एकूण १२४ यंत्रांपैकी ९५ टक्के यंत्र बंद पडले आहेत. या यंत्रांवर जवळपास दोन कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. हा सर्व निधी पाण्यात गेला आहे.सर्वच विभागांनी केले हात वरधान रोवणी यंत्रांचे वितरण मानव विकास मिशनचा निधी, जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेच्या निधीतून करण्यात आले. त्याला तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले होते. वितरण झाल्यानंतर मात्र या सर्वच विभागांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी योग्य मार्गदर्शनाअभावी सदर यंत्र धूळखात पडून आहेत.उणिवा लक्षात न घेताच यंत्रांचे वितरणधान रोवणी यंत्राच्या सहाय्याने रोवणी करावयची असल्यास धानाचा परा मॅट नर्सरीवर टाकावा लागतो. पºयाचे १५ ते २० दिवसांच्या कालावधीत रोवणे होणे आवश्यक आहे. पºयाची उंची एकदम वाढल्यास यंत्राने रोवणी करताना अडचण निर्माण होते. रोवणी वेळेवर होण्यासाठी पाऊस पडला किंवा नाही पडला तरी स्वत:ची सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा नाही. पाऊस पडला नाही तर कधीकधी दीड महिना धान रोवणीला विलंब होते. त्यामुळे धान यंत्राच्या सहाय्याने रोवणी शक्य नाही. ही बाब जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकारी व कृषी सभापतींनी उपयोगिता लक्षात न घेताच नावीण्यपूर्ण उपक्रम म्हणून शेतकºयांच्या माथी रोवणी यंत्र मारले. मात्र जो परिणाम व्हायचा होता, तो आता दिसून येत आहे.शेतीचे यांत्रिकीकरण वाढावे, यासाठी शासनाकडून अनुदावर नवीन यंत्र उपलब्ध करून दिले जात आहेत. तर दुसरीकडे शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या यंत्रांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा परिषदेने काही निधी धान रोवणी यंत्रांच्या दुरूस्तीसाठी उपलब्ध करावा. त्याचबरोबर संबंधित यंत्र दुरूस्त करणारे कारागीर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा सदर यंत्र भंगारात विकावे लागणार आहे.
बचत गटांना वाटलेले धान रोवणी यंत्र भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:54 AM
जिल्हाभरातील १२४ बचत गटांना दोन वर्षांपूर्वी धान रोवणी यंत्रांचे वितरण केले होते. दोन कोटी रूपये किमतीचे हे साहित्य देखभाल व दुरूस्तीअभावी बंद पडले असून पुन्हा पारंपरिक रितीनेच धानाची रोवणी करण्याकडे शेतकरीवर्ग वळला आहे.
ठळक मुद्देनियोजनशून्यतेचा परिणाम : सुमारे दोन कोटी रूपयांचा निधी पाण्यात