कमलानगर येथील माेहम्मद फिराेज अब्दुल बशीर हा अवैध कत्तलखाना चालवित असल्याची गाेपनीय माहिती देसाईगंज पाेलिसांना प्राप्त झाली. त्यावरून बशीर याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरी दाेन लाेखंडी सत्तूर आढळून आल्या. तसेच तीन गायी व तीन बैल आढळून आले. त्याच्याकडे कत्तलखान्याचा काेणताही परवाना आढळून आला नाही. त्याच्याकडे असलेली जनावरे कत्तलीसाठीच ठेवण्यात आली असल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलानगरातीलच सुनील त्रिपालदास परसवाणी याच्याकडून २ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली तसेच आंबेडकर वाॅर्डातील प्रशांत दिवाकर बागळे व फरी येथील निखिल प्रभूू मलगम या दाेघांकडून १३ हजार रुपयांची दारू व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाया देसाईगंजचे ठाणेदार विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या.