शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पावणेदोन लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 1:01 AM

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने कठाणी नदी पुलाजवळ शनिवारी १ लाख ७४ हजार रूपये किमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : कठाणी नदी पुलाजवळ कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने कठाणी नदी पुलाजवळ शनिवारी १ लाख ७४ हजार रूपये किमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.चारचाकी वाहनाने आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलाजवळ देशी, विदेशी दारू आणून ठेवली आहे, अशी गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवळे, पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र जगदाळे, नायक पोलीस शिपाई खामदेव कोहपरे यांच्यासह पथकाने पंचासह कठाणी नदी पूलाजवळ पोहोचले. या परिसरात शोध घेतला असता, दारू आढळून आली. पांढऱ्या रंगाचे पाच खरड्याच्या बॉक्समध्ये विदेशी कंपनीची दारू आढळली. त्याचबरोबर खाकी रंगाच्या १५ बॉक्समध्ये प्रती बॉक्स १०० निपा प्रमाणे एकूण १ हजार ५०० देशी दारूच्या बॉटल आढळल्या. या सर्वांची किंमत १ लाख ७४ हजार रूपये होते. याप्रकरणी राकेश राजेंद्रलाल पिल्लेवार (३१) रा. गोंदिया, सोनू वामन फुलेवार रा. गोकुलनगर या दोघांना अटक केली. यातील बिरज चांदवानी रा. गोंदिया हा आरोपी फरार असून त्याच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.