शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अखेर मिळाले पंचनाम्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:58 PM

निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचे तांडव : पीकांच्या नुकसानीची पाहणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच सत्ता स्थापनेत सर्वजण व्यस्त असताना मंगळवार दि.२९ रोजी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने गुरूवारी (दि.३१) हे आदेश जारी केले. त्यामुळे येत्या आठवड्यात पंचनाम्यांना वेग येणार आहे. मात्र पंचनाम्यांना उशिर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार का? याबद्दल शंकाही व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही.एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कापूस, सोयाबीन, धान, तीळ आदी खरिपाची पिके निघण्याच्या मार्गावर असताना अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कमी कालावधीच्या धानाच्या कापलेल्या कडपा पाण्यात भिजत आहेत.सतत आठ दिवस बांधीत पाणी साचून असल्याने सदर धान पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यम कालावधीचे धान परिपक्व झाले आहे. पावसामुळे या धानाची कापणी लांबली आहे. तर जास्त कालावधीचे धान आता निसवले आहे. जोराच्या वादळ वाºयामुळे हे धान जमिनीवर कोसळले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. कापसाचे बोंड फुटले आहेत. पावसात भिजून त्यांचेही नुकसान झाले आहे. हातात आलेले पिक नष्ट होताना बघून शेतकºयाची चिंता वाढली आहे. मात्र निसर्गासमोर हतबल होण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नसल्याने तो केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहे.शेतकरी अडचणीत आला असताना मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचीत आमदार सत्ता स्थापनेच्या कामात व्यस्त आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या लागल्या. आता दिवाळीच्या सुट्या संपल्या असल्या तरी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयांमध्ये रूजू झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे होऊ शकले नाही.आपल्या कार्यक्षेत्रात नुकसान झाल्याचे माहित असतानाही अनेक कर्मचारी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे अनेकांनी अजूनही पंचनामे केले नाही. पंचनाम्यांना उशीर झाल्यास मदत मिळण्यास विलंब होणार हे सत्य आहे. निवडणुकीत मते मागण्यासाठी शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखविणारे सरकार निवडणुकीनंतर मात्र आपले कर्तव्य विसरते हेच यावरून दिसून येते.-तर शेतकरी राहतील मदतीपासून वंचितमागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळवाºयासह पाऊस होत आहे. तसेच खरीप पिके निघण्याच्या मार्गावर असताना पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कुठेही ‘अतिवृष्टी’ झालेली नाही. मात्र राज्याच्या महसूल व वनविभागाने २९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात ऑक्टोबरमध्ये ‘अतिवृष्टी’मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या संभ्रमाचे वातावरण आहे. या पत्राचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, त्या ठिकाणी काहीच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी