केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत केंद्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसंबंधित माहिती दिली. ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. गावातील मुलामुलींना नाेकरीसाठी व स्पर्धा परीक्षांसाठी आपण केव्हाही मार्गदर्शन करू शकतो, यासाठी अधिकारी वर्ग नेहमी तयार आहे, असे पंढरीनाथ यांनी सांगितले. याप्रसंगी लहान मुलांकरिता गरजू लोकांना ब्लॅकेट आणि विद्यार्थी व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सीआरपीएफचे निरीक्षक अजित फळतरे व एसआरपीएफचे उपनिरीक्षक बाबासाहेब रेंगे उपस्थित होते.
या ग्रामभेटीमध्ये पोवणी गावातील पाेलीस पााटील देवनाथ किरंगे, ग्रामसभेचे अध्यक्ष सुधाकर उसेंडी यांच्यासह गावातील नागरिक व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी सहभाग घेतला.
280821\img-20210827-wa0012.jpg
सीआरपीएफ च्या कमांडन्ट नि साधला ग्रामस्थाशी संवाद