लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : घाईने बसवरून उतरणाºया प्रवाशाचे ५० हजार रूपये सिटवर पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर बस वाहकाने बस थांबवून प्रवाशाचे ५० हजार रूपये परत केले. प्रामाणिकपणा जपणाºया एसटी वाहक मनोज माणिकराव बागडे यांचे प्रवाशांनी कौतुक केले. सदर घटना आलापल्ली बसस्थानकावर सोमवारी सकाळी घडली.राकेश केशवराव अलोणे हे एमएच ४० डीएल ४१७१ क्रमांकाच्या सिरोंचा-नागपूर बसने प्रवास करीत होते. चंद्रपूरला जायचे असल्याने अलोणे हे आलापल्ली बसस्थानकावर घाईने बसवरून उतरले. दरम्यान त्यांच्या खिशातील ५० हजार रूपयांची रोकड बसच्या सिटवर पडून असल्याचे वाहकाला दिसले. तोपर्यंत राकेश अलोणे हे बरेच दूर गेले होते. त्यांच्या ओळखीचा बसमध्ये दुसरा कोणताही प्रवासी नसल्याने अलोणे यांना शोधून त्यांना सदर रक्कम परत करणे मोठे आव्हान ठरले असते. त्यामुळे बागडे यांनी बसस्थानकावरच जवळपास २० मिनिटे बस थांबवून अलोणे यांच्या बद्दल माहिती काढली. काही दूर अंतरावर गेल्यानंतर आपल्या खिशातील पैसे पडले असल्याचे अलोणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पुन्हा आलापल्ली बसस्थानक गाठले. तोपर्यंत बस बसस्थानकावर उभीच होती. त्यांनी पैशाची विचारणा केल्यानंतर वाहक बागडे यांनी ५० हजार रूपयांची रक्कम परत केली.आजच्या व्यावहारीक जगात माणुसकी व प्रामाणिकपण हरवत चालला आहे. पैशासाठी काही नागरिक भ्रष्टाचार व चोºया करून तुरूंगात जाण्यासही घाबरत नाही. वाहक बागडे यांनी मात्र त्यांना सापडलेली ५० हजार रूपयांची रक्कम सुमारे २० मिनिटे बस थांबवून परत केली. त्यांचा हा प्रामाणिकपणा इतर नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
प्रवाशाचे ५० हजार केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:32 PM
घाईने बसवरून उतरणाºया प्रवाशाचे ५० हजार रूपये सिटवर पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर बस वाहकाने बस थांबवून प्रवाशाचे ५० हजार रूपये परत केले.
ठळक मुद्देवाहकाचा असाही प्रामाणिकपणा : आलापल्लीतील घटना