लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महानगरपालिका व नगर पालिकांमध्ये कार्यरत सफाई कामगारांची राज्य शासनाकडून उपेक्षा केली जात आहे. राज्य शासनाकडून सफाई कामगारांकरीता विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांचा लाभ सफाई कामगारांना मिळत नाही. त्यामुळे या योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्याकरीता आपण कटिबद्ध असून राज्य सरकारकडे याकरीता शिफारस करण्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी दिली.बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना पवार म्हणाले, सफाई कामगारांच्या कल्याणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य नामक आवास योजना कार्यान्वीत करण्यात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सफाई कामगारांना ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्य शासनाद्वारा कोणत्याही सफाई कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. निधीच्या कमतरतेमुळे नगर पालिका प्रशासनातर्फे सदर सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळेच सफाई कामगारांना खुल्या हातानोच स्वच्छता करावी लागत आहे. केंद्र सरकारद्वारा सफाई कामगारांकरीता मुक्ति पुनर्वसन योजना गठित केली. मात्र ही योजना कागदोपत्रीच ठरली आहे, असे पवार म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने, कच्छवाह, सिरस्वान, छगन महातो उपस्थित होते.
सफाई कामगार योजनांपासून वंचित- पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:19 AM