महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, चामोर्शीच्या शिष्टमंडळाने ९ जून राेजी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांची भेट घेऊन ग्रामपंचायत निवडणूक मानधन व बीएलओचे मानधन देण्याची मागणी केली. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे कामाचे मानधन मिळाले नाही. तसेच राज्यातील काेणत्याही तालुक्यात बीएलओचे मानधन दाेन वर्षांपासून रखडलेले नाही. सदर मानधन लवकर द्यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तेव्हा तहसीलदार शिकताेडे यांनी पाच ते सहा दिवसात ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन देण्याचे आश्वासन दिले. तसेच निधी उपलब्ध हाेताच बीएलओंचेही मानधन दिले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदन देताना शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, संजय लोणारे, राजेश बाळराजे, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे, तालुका कार्याध्यक्ष ओमप्रकाश साखरे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.