लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी कमलापूर येथे घेण्यात आला. या मेळाव्यात अंगणवाडी महिलांना किमान ११ हजार रूपये वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीसाठी दीर्घकालीन लढ्याचा निर्धार करण्यात आला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विठाबाई भट होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. प्रास्ताविकातून फकीरा ठेंगणे म्हणाले, केंद्र शासनाने साडेआठ वर्षानंतर अंगणवाडी सेविकेच्या मानधनात दीड हजार आणि मदतनीसच्या मानधनात ७५० रूपये वाढ घोषित केली होती. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. घोषणेनुसार मानधन वाढ लागू करावी व दरम्यानच्या काळातील थकबाकी द्यावी, या मागणीला घेऊन २ ऑक्टोबरला गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्याचा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.मेळाव्यादरम्यान नीलेश देवतळे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळ शिकविले. त्यानंतर प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी मार्गदर्शन केले. दहीवडे म्हणाले, दुर्बल घटकावरील अन्याय कधीच संपत नाही. म्हणून आपला लढा देखील संपणार नाही. मागील अनेक वर्षांपासून अत्यल्प मानधनावर ग्रामीण व शहरी भागात बालकांना पोषण आहार देण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करीत आहेत. परंतु त्यांना वेठबिगारीनुसार अत्यल्प मानधन दिले जात आहे. यासाठी कर्मचाºयांचा संघर्ष सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाºयांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दीर्घकालीन लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले.मेळाव्याचे आभार माया नैैनूरवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी कुसूम नागोसे, रंजना चौफुंडे, प्रभा बारेकर, ललीता केदार, चंद्रकला कुंभारे, कपिला गोंगले, प्रभा भगत यांनी सहकार्य केले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 5:05 AM
अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी कमलापूर येथे घेण्यात आला. या मेळाव्यात अंगणवाडी महिलांना किमान ११ हजार रूपये वेतन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच या मागणीसाठी दीर्घकालीन लढ्याचा निर्धार करण्यात आला.
ठळक मुद्देदीर्घकालीन लढ्याचा निर्धार : एक वर्ष उलटूनही मानधनवाढ झाली नसल्याचा आरोप